|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » हल्लाबोल मोर्चा अस्वच्छता करण्यासाठीच

हल्लाबोल मोर्चा अस्वच्छता करण्यासाठीच 

प्रतिनिधी/ सातारा

भाजपाचा सत्कारसोहळयाचा कार्यक्रम स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अथवा कराड येथील अभिवादन यात्रेला जिह्यातून  स्वयंस्फुर्तीने लोक आले होते. स्वच्छता आणि टापटीपपणाही दिसत होता. मात्र, राष्ट्रवादीने जो हल्लाबोल मांडला आहे. त्यासाठी पैसे देवून माणसे आणली, आणलेल्या माणसांची तहान भागवण्यासाठी प्लॉस्टिकचे ग्लास अन् प्लॉस्टिकच्या बाटल्या तेथेच टाकून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर अस्वच्छ केला. हा हल्लाबोल मोर्चा नव्हता तर अस्वच्छता करण्यासाठीच मोर्चा होता, असा घणाघाती आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, भाजपाचे सरकार राज्यात आणि देशात आले. सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहेत. होत असलेला विकास पाहूनच राष्ट्रवादीच जळफळाट होवू लागला आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ थेट तळागाळातल्या लाभार्थ्यांना मिळू लागला आहे. पुढाऱयांची दलाली संपली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवाल्यांचा डोळे गरगरु लागले आहेत. साताऱयात भाजपाने सरपंच, ग्रामसेवकांचा सत्कार सोहळा घेतला. त्या सोहळय़ानंतर कसलीही अस्वच्छता झाली नव्हती. त्या कार्यक्रमाला स्वयंप्रेरणेने नागरिक आले होते. तसेच कराड येथे घेण्यात आलेला अभिवादन कार्यक्रमाला जिह्यातील जनता स्वयंस्फुर्तीने आली होती. भाजपाच्या कार्यक्रमांना होत असलेली गर्दी आणि विकासात्मक दृष्टीकोन यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना नागरिक पाठ फिरवत आहेत, असे दिसू लागले आहे. जिह्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. साताऱयाचा हल्लाबोल मोर्चा काढला. त्या मोर्चाला गावागावातून कार्यकर्त्यांना आणण्यासाठी पाकिटे वाटली. आमदार पूत्र तेजसला साधी चार पावले मोर्चात चालता आले नाहीत. उचलून घेणाऱयालाही बक्षिसी कोणी दिली. मोर्चामध्ये पाण्याच्या बाटल्या आणि पाण्याचे ग्लास वाटले त्याने आपली लायकी समजली. जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर अस्वच्छ केलात. त्यामुळे तुम्ही काढलेला मोर्चा हा अस्वच्छता करण्यासाठीच होता. वातावरण गढूळ करण्यासाठीच होता, असा आरोप भाजपाने केला आहे.

Related posts: