|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » हे सरकार बेचिराख झाले पाहिजे

हे सरकार बेचिराख झाले पाहिजे 

प्रतिनिधी/ सातारा

हे सरकार शहरीकरणाचे आहे. गोरगरिबांचे नाही. एमएसईबीला वॉर्निंग दिली आहे. आम्ही 20 मागण्या दिल्या आहेत. एक महिन्यांची मुदत दिली आहे. जर त्या पूर्ण केल्या नाहीत तर पोलिसांच्या समक्ष सांगतो केस झाली तरी बेहतर, टाळा ठोकणार म्हणजे ठोकणार. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाने सरकार विरोधात वात पेटली पाहिजे. अग्नि होवून हे सरकार त्या अग्नित बेचिराख करा. जिह्यात इतके खड्डे पडलेत. बेशरम मंत्री झालेत. हे सरकार म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या असेच झाले आहे, असा घणाघाती आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपावर केला. दरम्यान, शेखर गोरे यांच्यावर लावलेल्या मोक्यावर आवाज जिह्यातील आमदारांनी विधानसभेत आवाज उठवावा, असे आवाहनही सोनल गोरे यांनी केले.

हल्लाबोल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. त्यानंतर सभेमध्ये रुपांतर झाले. त्यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफीची योजना काढली. घोर फसवणूक केली आहे. महापुरुषांची नावे योजनांना देवू नका. छत्रपतींचे नाव घेवून सत्तेत आलात आता छत्रपतीच तुमचे नाव सत्तेतून पुसतील. या सरकारने जिह्याला विकासापासून वंचित ठेवले आहे. महावितरणच्या अधिकाऱयांना टाळे देवून आलोय. पोलिसांच्या देखत सांगतो. एक महिन्यात जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर टाळा ठोकणार म्हणजे ठोकणार. हे दळभद्री सरकार लवकरच जाणार आहे. सरकाला गोरगरीबांची जाण नाही. फडणवीस हे कराडला आले. यशवंतरावाच्या समाधीस्थळी जाण्याचीही त्यांची लायकी नाही. हुकूमशाहीचे हे राज्य आहे. दाखवत असलेल्या जाहीरातीमध्ये बघून बघून त्यामध्ये तथ्य काहीच नाही. 300 कोटी जाहिरातीला. शेतकऱयांच्या कर्जमाफीला पैसा नाही याच्याकडे आता यांचाच सातबारा कोरा केला पाहिजे. बिदालमध्ये पाणी फौडेशनने आणि लोकांनी काम केले. तेथे काय गहु येतो का?भात येते का?, आमच्या काळात बंधारे बांधले अन आता पाऊस झाला. तरीही त्यांनी पुन्हा जाहिराती वाढवल्या आहेत. अब की बार मोदी सरकार नाही तर अब की बार घर जावो सरकार. शाहु, फुले यांच्या विचारांचे पवारसाहेबांचे सरकार येणार आहे. 1 डिसेंबरपासून जळगाव ते 12 डिसेंबर अशी पायी दिंडी नागपूरपर्यंत काढण्यात येणार आहे. राज्यभरातून लाखो लोक या दिंडीत सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. राज्यातील हे सरकार म्हणजे एक ना धड भाराभर च्ंिांध्या आहेत. 26 मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत. शेतकऱयांना वीज कट करण्याची धमकी दिली जाते. या सरकारला मस्ती आली आहे. वीज कट करण्यासाठी आलेल्या अधिकाऱयांना त्याच वायरीने करंट देण्यात येईल. 15 हजार वीज कनेक्नश दिले नाहीत. सगळे अधिकारी चांगले आहेत. हतबल आहेत. डिपीसीत पालकमंत्री हतबल आहेत. मुख्यमंत्री आले त्यांनी महिनाभरात मेडिकल कॉलेजचाप्रश्न मार्गी लावतो असे सांगितले. आम्ही अजून तो महिना कधी संपतोय बघतोय.

जिह्यावर हक्क आमचाच

नोटाबंदीने माणसं मेली. सोयाबीन आणि घेवडय़ाने तर वाटूळ केलं.आमचा या सरकारच्या हल्लाबोल सुरु आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा बालेकिल्लाच राहणार आहे. कोणाची माय व्याली नाही, जिह्यावर हक्क सांगायला, अशा खरमरीत भाषेत मंत्री चंद्रकांत पाटील यांना फटकारत, गुन्हेगारी मोडीत निघावी यासाठी आमचे दुमत नाही. परंतु मोका आणि तडीपारीचे राजकारण होवू नये, मीराभाईदरमध्ये सत्ता कशी आणली?, कोण गुंड सोबत होते. हे आम्हाला माहिती आहे. शेखर गोरे यांच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यावर मोक्का लावला ती बाब चुकीची आहे. ओल्याबरोबर सुकेही जावू नये. रोज खून पडताहेत, परवा उंब्रजला दरोडा पडला. घरफोडय़ा होताहेत, कायदा सुव्यवस्था राहिली नाही, असे सांगत त्यांनी मोका सगळय़ांना मिळाला पाहिजे, आदमी भी बदल जाता आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार बाळासाहेब पाटील, सोनल गोरे, संग्राम कोते-पाटील, तेजस शिंदे यांची झंझावाती भाषणे झाली. भाषणांवेळी आमदार शिंदे यांच्या नावाचा जयघोष होत होता. तर सोनल गोरे यांच्या भाषणावेळी शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्याची घोषणा दिल्या.

Related posts: