|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राष्ट्रवादीचा साताऱयात हल्लाबोल

राष्ट्रवादीचा साताऱयात हल्लाबोल 

प्रतिनिधी/ सातारा

बघताय काय, सामिल व्हा, या सरकारचं करायचं काय?, हल्लाबोल… हल्लाबोल, पवारसाहेबांचा विजय असो, शेतकऱयांच्या मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी सातारा शहर दणाणून सोडत महावितरण कार्यालयापासून राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. महावितरणच्या अधिकाऱयांना टाळा भेट देवून एक महिन्याची डेडलाईन दिली. दरम्यान, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महावितरणच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, राज्याचे युवकचे अध्यक्ष संग्राम कोते – पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, खटाव पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे, पंचायत समितीचे सदस्य राहुल शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, सोनल गोरे, सुरेखा पखाले, बाळासाहेब महामुलकर, अतुल शिंदे, गोरखनाथ नलावडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी शेखर गोरे यांचा राजकीय मोक्का रद्द करा, स्थानिक बेरोजगारांना नोकऱया द्या, बडय़ा घोषणा बडे दावे, फसव्या योजना फसवे कावे, अशा आशयाचे फलक घेतले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कर्जमाफी योजनेतंर्गत राज्यातील सर्व शेतकऱयांना सर्व प्रकारची सरसकट कर्जमाफी देवून त्यांचा सातबारा तातडीने कोरा करावा, गेल्या तीन वर्षात शेतमालाच्या निर्यातीत 54 हजार कोटी रुपयांची घट होवून आयात 65 हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. शेतकरी विरोधी व्यापक धोरणामुळे गेल्या 3 वर्षात एकाही पिकाला हमीभावाचा एवढा बाजारभाव मिळू शकला नाही. तात्काळ उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा असे हमी भावाचे धोरण जाहीर करावे, राज्यात सत्ता बदल होताना होतेवेळी 2 लाख 89 कोटीचे कर्ज होते. आज 4 लाख 54 कोटी इतके झाले. तीन वर्षात राज्यात 1 लाख 55 हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले. राज्य दिवाळखोरीत गेले. नोटबंदीमुळे शेती, उद्योग क्षेत्राच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी व राज्याचे आर्थिक दिवाळखोरीत गेले. नोटाबंदीमुळे शेती, उद्योग क्षेत्राच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी व राज्याच्या आर्थिक दिवाळखोरीची श्वेत पत्रिका काढून कर्ज घेतलेल्या प्रत्येक प्रैशाचा जनतेला हिशोब द्यावा, फसव्या व खोटय़ा जाहिराती बंद करुन जनतेच्या पैशाची बचत करावी, राज्यातील मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणाबाबत दिलेली आश्वासने सरकारने पाळली नाहीत.

या समाजामध्ये विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाली आहे. शासनाच्या क्या हुआ तेरा वादा असे प्रश्न जाहिररित्या जनता विचारु लागली आहे. या समाजाना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आरक्षण लागू करण्यात यावे, वीज धोरणाबाबत राज्य शासनाने जिह्याला दिलेली सापत्न वागणूक बंद करावी, अशा सुमारे 73 मागण्यांचे निवेदन महावितरण कंपनी आणि जिल्हाधिकाऱयांना दिले आहे.

 

गर्दीमुळे स्टेज पडण्याची स्थिती

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर पदाधिकाऱयांची नुसतीच स्टेजवर चढण्यास घाई झाली. स्टेजवर गर्दी झाल्याने स्टेज डगमगू लागले होते.  त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांनी मी खाली येतो, असे सांगताच स्टेजवरुन बऱयापैकी कार्यकर्ते खाली गेले आणि पोलिसांनीही सुटकेचा निश्वास टाकला.  

Related posts: