|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » अनिकेत कोथळेच्या भावाचा पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

अनिकेत कोथळेच्या भावाचा पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न 

ऑनलाईन टीम / सांगली  :

सांगलीच्या अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाच्या तपास योग्यपद्धतीने होत नसल्याचा आरोप करत अनिकेतच्या दोन भावांनी पोलीस ठाण्यबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला, अमित कोथळे आणि आशिष कोथळ अशी या भावांडांची नावे आहेत.पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

अनिकेत कोथळे या तरुणाला सांगली शहर पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. चौकशी दरम्यान पोलिसांनी अनिकेतला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला. हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि अन्य पाच पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबोलीतील जंगलात नेऊन जाळला. अनिकेत पोलिसांच्या तावडीतून पळाला, असा बनावही पोलिसांनी रचला होता. मात्र अनिकेतच्या कुटुंबीयांनी पाठपुरावा केल्याने अनिकेतचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याप्रकरणी युवराज कामटेसह पाच जणांना अटक करण्यात आली. तर सांगली शहर पोलीस ठाण्यातील सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

 

 

 

Related posts: