|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ले तालुका स्काऊट-गाईड मेळाव्यात 54 शाळांचा सहभाग

वेंगुर्ले तालुका स्काऊट-गाईड मेळाव्यात 54 शाळांचा सहभाग 

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय व प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेतोरे हायस्कूल येथे झालेल्या स्काऊट-गाईड व कप-बुलबुल तालुका मेळाव्यात 54 शाळांमधील 194 स्काऊट-गाईड, कब, बुलबुल, स्काऊटर गाईडर इत्यादींनी सहभाग घेतला. यावेळी गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख विषय तज्ञ व स्काऊट, गाईडचे जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. 

 शिबिराचा समारोप गटशिक्षणाधिकारी गजानन गणबावले यांच्या उपस्थितीत झाला. शिबिराचे उद्घाटन जि.प.चे शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्काऊट, गाईडचे जिल्हा मुख्यायुक्त प्रमोद कामत, मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर, स्काऊट, गाईडच्या जिल्हा चिटणीस सुलभा देसाई, जिल्हा कोषाध्यक्ष प्रदीप शिंदे, जिल्हा आयुक्त उषा आठले, जिल्हा मुख्यालय आयुक्त अन्वर खान, जिल्हा संघटन आयुक्त अंजली माहुरे, मार्गदर्शक श्री. पडवळ, श्री. लांबर, मंगेश कांबळी, श्री. साबळे, सीमा पोईपकर, अर्चना बागवे व तन्वी रेडकर उपस्थित होते. प्रास्ताविक सुलभा देसाई यांनी केले.

Related posts: