|Friday, October 19, 2018
You are here: Home » उद्योग » सलग आठ सत्रांच्या तेजीला अखेर ‘ब्रेक’

सलग आठ सत्रांच्या तेजीला अखेर ‘ब्रेक’ 

बीएसईचा सेन्सेक्स 106, एनएसईचा निफ्टी 29 अंशाने घसरला

वृत्तसंस्था / मुंबई

मंगळवारी बाजारात सुस्ती दिसून आली. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीच्या सलग 8 सत्रांच्या तेजीला ब्रेक मिळाला आहे. निफ्टी 10,380 पर्यंत घसरला, तर सेन्सेक्स 100 अंशापेक्षा जास्तने घसरला.

बीएसईचा सेन्सेक्स 106 अंशाच्या घसरणीने 33,618 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 29 अंशाच्या घसरणीने 10,370 वर स्थिरावला.

मिडकॅप निर्देशांक विक्रमी पातळीवरून खाली घसरला. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.1 टक्क्यांनी घसरत 17,039 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 20,098 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.25 टक्क्यांनी वधारत 18,214 वर बंद झाला.

पीएसयू बँक, आयटी, औषध, रिअल्टी, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू समभगात विक्री झाली. बँक निफ्टी 0.2 टक्क्यांनी घसरत 25,846 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 1.1 टक्के, आयटी निर्देशांक 0.4 टक्के, औषध निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरला. बीएसईचा रिअल्टी निर्देशांक 0.5 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू 0.9 टक्के, ऊर्जा निर्देशांक 0.4 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 0.3 टक्क्यांनी घसरला.

दिग्गज समभागांची कामगिरी

भेल, जी एन्टरटेनमेन्ट, इंडियाबुल्स हाऊसिंग, मारुती सुझुकी, एशियन पेन्ट्स, इन्डसइंड बँक, कोल इंडिया, एचडीएफसी 2-1 टक्क्यांनी वधारले. भारती इन्फ्राटेल, अरबिंदो फार्मा, एनटीपीसी, सन फार्मा, ओएनजीसी, भारती एअरटेल, टाटा मोटर्स 2.25-1.25 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात बायोकॉन, टाटा ग्लोबल ब्रेव्हरेजीस, पिरामल एन्टरप्रायजेस, टोरेन्ट पॉवर, युनायटेड बुअरीज 4.2-2.8 टक्क्यांनी वधारले. आदित्य बिर्ला फॅशन, ग्लेनमार्क फार्मा, सीजी कंज्युमर, अपोला हॉस्पिटल, इंडियन बँक 4.1-2.5 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात मर्क इलेक्ट्रॉनिक्स, संघवी मुव्हर्स, जयश्री टी, एस्ट्रा मायक्रोव्हेव, एव्हरेस्ट इन्डस्ट्रीज 19.5-13.3 टक्क्यांनी वधारले. रिलायन्स नेव्हल, टिलकनगर इन्डस्ट्रीज, एक्सिसकॅड्स इंजीनियरिंग, इंडो राजा सिंथेटिक, नेलकास्ट 8.1-5.3 टक्क्यांनी घसरले.

Related posts: