|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शासनाच्या सर्वच खात्यात प्रचंड भ्रष्ट्राचार.अरूण लाड.

शासनाच्या सर्वच खात्यात प्रचंड भ्रष्ट्राचार.अरूण लाड. 

प्रतिनिधी/ कडेगांव

राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.पोलीस खात्याचे लोकच नागरीकांचा खून करू लागले आहेत.शासनाच्या सर्वच खात्यात भ्रष्ट्राचार प्रचंड प्रमाणात बोकाळला असून राज्यात अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे.असे प्रतिपादन कडेगाव पलुस राष्ट्रवादीचे नेते अरूण लाड यांनी केले.,

 कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अरूण लाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व सामान्य नागरीकांच्या विविध मागण्यासाठी शेतकऱयांचा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला यावेळी ते बोलत होते.

  शेतकरी व सामान्य नागरीकांच्यावतीने कडेगावच्या तहसिलदार सौ.अर्चना शेटे यांनी निवेदन देण्यात आले.

 पुढे बोलताना अरूण लाड म्हणाले की राज्यात महागाईने कळस गाठला आहे.पेट्राले डिझेल आणि गँसच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत.शासनाच्या चुकिच्या धोरणामुळे शेती मालाच्या किंमती गडगडल्या आहेत.नोटाबंदीमुळे अनेक लहान मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत.शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

  यावेळी कडेगाव तालुका अध्यक्ष पृथ्वीराज कदम,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष भरत देशमुख,प्रमोद महिंद,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव पवार,वैशाली मोहिते,रग्नामचंद पवार,दत्ताजीराव मोहिते,नारायण पाटील,भिमराव महिंद,अंकुश यादव.जयराम कुंभार,गोरख औधे,सतीश माळी,सिकंदर मुल्ला,अभिजित वांगीकर,अमोल पाटील यांच्यासह कडेगाव व पलुस तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: