|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » तरूणाई निघालीय व्यसनाच्या विळख्यात

तरूणाई निघालीय व्यसनाच्या विळख्यात 

अमर वांगडे/ सातारा

व्यसनाच्या आहारी जाणाऱया तरूणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. विविध कारणांनी आजकालची तरूणाई ही व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहे.  मुलांपासुन ते मुलींपर्यत आणि अगदी लहान वयापासुन मुले व्यसनाधीन झालेली दिसतात. मग ते कोणतेही व्यसन असो. अंमली पदार्थाचं सेवन करणे, धुम्रपान करणे, मद्यपान करणे या गोष्टी आजकालच्या युवापिढीसाठी एक प्रकारची ‘स्टाईल’च बनुन गेली आहे.

लग्नाच्या वरातीमध्ये तसेच मित्रांच्या यात्रेला, वाढदिवसाला, थर्टी फस्टला, अशा वेगवेगळया कार्यक्रमामध्ये तरूणाई व्यसन करत असतात. मग यामध्ये आनंद व्यक्त करणे किंवा दुख व्यक्त करण्यासाठी मुले या व्यसनाच्या आहारी जात असतात. दारु एकाने घेतली की दुसऱयाला पण तिच सवय लागत असते. अशी हळुहळु  सवय त्यांना लागुन जात असते. पुणे, मुंबई मधील मुले-मुली जशी स्टाईल करतील तसेच अनुकरण येथील युवक करत असतात. तसेच घरामधील मोठयांचे अनुकरण करणे यांसारख्या गोष्टींमुळे आजकालच्या 9वी 10 वी मधील मुलांच्यादेखील बॅग मध्ये अंमली पदार्थ सापडत आहेत.

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त व्यसनाधीन मुले…

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील युवक हे जास्त व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. शहरीभागात अनेक ठिकाणी व्यसनाचे पदार्थ विकले जातात. यामुळे मित्रांच्या संगतीने मुलांना व्यसनाची सवय लागत असते.

मद्यधुंद अवस्थेत मुलांकडून गुन्हे…

मद्यधुंद नशेच्या अवस्थेत अनेकवेळा या मुलांकडून गंभीर गुन्हे घडत असतात. तसेचं ते अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी त्याच्याकडून चोरी, दरोडे, खून, मुलींसोबत गैरवर्तन, यांसारखे गुन्हे घडत असतात, या अंमली पदार्थामुळे गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. काही दिवसांपुर्वीच अजिंक्यतारा या किल्यावर नशेत असताना आपल्या मित्राचा खुन केला. यांसारख्या अनेक गोष्टी व्यसनामुळे पहायला मिळत आहेत. याचबरोबर घरामध्ये पत्नीचा छळदेखील केला जात असतो. मद्याधुंद होवून नशेत गाडी चालवणे यामुळे होणारे अपघात अशा अनेक गोष्टी आपल्याला पहायला मिळत आहे. सर्वात जास्त गुन्हे हे नशेच्या अवस्थेतूनच झालेले पहायला मिळत आहेत.

व्यसनाधीन मित्र संगती… 

शाळा, कॉलेज मध्येच मुलांना व्यसनाची सवय लागत असते. 10वी पास झाल की मुलांना शिंगे फुटत असतात. त्यांच्यामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. 10 पर्यंत साधी, शांत आणि सरळ वागणारी मुल-मुली महाविद्यालयाला गेली अनं बाहेरची हवा लागली की, अचानक त्यांच्यामध्ये बदल होत असतो. बसस्थानक परिसरामध्ये उनाडक्या करत बसणे, महाविद्यालच्या कटटयावर गप्पा ठोकत बसने, थर्टी फस्ट वा इतर पार्टी करणे याच प्रवृत्तीमुळे तरूण पिढी व्यसनाच्या भोवऱयात अडकताना दिसत आहे. यामध्ये महाविद्यालयीन मुलांचा मोठा सहभाग असतो. यामध्ये मद्यपान व अंमलीपदार्थाचे सेवन हे मोठय़ाप्रमाणावर होताना दिसत आहे.

व्यसन मुक्त केंद्रवर महिलांचे जास्त प्रमाण

व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत. पतीला व्यसनाची सवय असल्याने सर्व पगार हा व्यसनावरच तो उडवत असतो. यामुळे घर संभाळण्याची जबाबदारी ही घरातील महिलेवरच येत असते. तेव्हा एकटीला घराचा सर्व खर्च उचलावा लागत असतो. मुलांचे शिक्षण, त्यांचा खर्च यांसारख्या गोष्टी घरातील पुरूष व्यसनाच्या आहारीगेल्यामुळे सर्व खर्च हा स्त्राrला पहावा लागत असतो. यामुळे पतीला व्यसनापासुन मुक्त करण्यासाठी महिलांना जास्त व्यसन केंद्राकडे जावे लागत आहे.

 

Related posts: