|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » मी ‘लष्कर -ए -तोयबा’चा समर्थक :परवेश मुशर्रफ

मी ‘लष्कर -ए -तोयबा’चा समर्थक :परवेश मुशर्रफ 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

मी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मोठा समर्थक आहे, असे विधान पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी केले आहे. लष्कर -ए-तोयबा संघटनेलाही मी आवडतो,असेही त्यांनी म्हटले.

तसेच लष्कर- ए-तोयबा आणि जमात -उद-दावा संघटनांकडून काश्मीरमध्ये केल्या जाणाऱया कारवायांचेही त्यांनी समर्थन केले. पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुशर्रफ यांनी हाफिज सईद,त्याची दहशतवादी संघटना यावर भाष्य केले. ‘लष्कर -ए-तोयबाचा संस्थापक आणि मुंबईवरील26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद यांच्या कारवायांचे समर्थन करता का?, असा प्रश्न परवेझ मुशर्रफ यांना विचारले असता त्यानीं या प्रश्नावर मान डोलावून,‘हाफिज सईदचा काश्मीरमधील कारवायांमध्ये सहभाग आहे आणि मी त्या कारवायांचे समर्थन करतो’,असे मुशर्रफ म्हणाले. हाफिज गेल्याच आठवडय़ात पाकिस्तानने नजरकैदेतून सुटका केली .पाकिस्तान सरकारने हाफिजच्या नजरकैदेत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.मात्र पुरावयाआभावी त्याची सुटका करण्यात आली.

 

 

 

 

Related posts: