|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » Top News » कोपर्डीच्या निकालाने पीडीतेला न्याय : मुख्यमंत्री

कोपर्डीच्या निकालाने पीडीतेला न्याय : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणात अहमदनगर सत्र न्यायालयाने तीन्ही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या निकालाने पीडितेला न्याय मिळाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

16 जुलै 2016 रोजी कोपर्डीतील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर  बलात्कार करून तिच्यावर निघृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर जितेंद्र शिंदे,सतोष भावळ आणि नीतीश भैलुमे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि अहमदनगर सत्र न्यायलयात हा खटला सुरू होता. या नराधमांना फाशीच व्हावी अशी मागणी व्यक्त केली जात होती. यासाठी राज्यभर मराठा मोर्चे देखील निघाले. दीड वर्षांच्या सुनावणीनंतर अखेर आज अहमदनगर सत्र न्यायालयने या तीन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवली. या निर्णयाचे स्वागत संपूर्ण स्तरातून होत आहे,याबबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ कोपर्डीच्या निकालाने पीडितेला न्याय मिळाला आहे. गेलेली भगिनी परत नाही येऊ शकत परंतु या निकालाने तिच्या आत्म्याला शांती नक्कीच मिळाली असेल. यासोबतच विक्रमी वेळेत हा खटल पूर्ण केल्याने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे त्यांनी अभिनंदन केले.

 

Related posts: