|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News » दहावी बारावीचा परीक्षांचा वेळापत्रक जाहीर

दहावी बारावीचा परीक्षांचा वेळापत्रक जाहीर 

पुणे / प्रतिनिधी :
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शक्षिण मंडळामार्फत पुढील वर्षी (२०१८) घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षांचे जाहीर केलेले वेळापत्रक कायम राहणार आहे. दहावीच्या द्वितीय सत्रातील नविन व्यवसाय विषयांची परीक्षा दि. ५ मार्चला द्वितीय सत्र ऐवजी दि. १७ मार्च रोजी प्रथम सत्रात होणार आहे. हा अपवाद वगळता वेळापत्रकात बदल नाही. मंडळाने या वेळापत्रकावर लोकप्रतिनिधी, पालक, शक्षिक, संघटना आणि वद्यिार्थी यांच्याकडून आलेल्या तक्रारी आणि सूचनांच्या आधारे हा नर्णिय घेतला आहे.

राज्य मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक एक वर्ष अगोदर जाहीर केले जाते. या वेळापत्रकावर लोकप्रतिनिधी, पालक, शक्षिक, संघटना आणि वद्यिाथ्र्यांचे १५ दिवसाच्या आत अभप्रिाय मागविले जातात. त्याआधारे तारखेत बदल केला जातो. गतवर्षी संघटनांच्या हरकतींचा विचार करून बदल करण्यात आला होता. मात्र, यंदा वेळापत्रक कायम ठेवण्याचा नर्णिय मंडळाने घेतला आहे. काही दिवसांपुर्वी मंडळाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे. 

परीक्षेचं वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं असलं, तरी छापील स्वरुपात प्रत्येक शाळा आणि महावद्यिालयांमध्ये पाठवण्यात येणार आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळातर्फे शाळा आणि कनष्ठि महावद्यिालयांना कळवण्यात येणार आहे. दरम्यान, मंडळाच्या संकेतस्थळाव्यतिरक्ति इतर संकेतस्थळ किंवा व्हॉट्सॲपवरुन फॉरवर्ड होणाऱ्या वेळापत्रकांवर वश्विास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.
  

Related posts: