|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » योगमाया कंसाच्या कारागृहात

योगमाया कंसाच्या कारागृहात 

बालकरूपी भगवंताला घेऊन वसुदेव गोकुळात पोहोचले. उत्तर रात्रीची वेळ होती. सारे गांव गाढ झोपेत होते. गोकुळामध्ये यशोदामाईसुद्धा गर्भवती होती आणि ह्याचवेळी तिचीही प्रसूती झालेली होती. भगवंताची योगमाया कन्यारूपाने तेथे प्रकट झालेली होती. परंतु फक्त मूल झाले आहे एवढेच यशोदामाईला ज्ञात झाले. लगेचच भगवंताच्या मायेने तिला असे काही मोहित केले की, यशोदामाई थकून गाढ झोपी गेली. गाढ झोपेमुळे मुलगा झाला की मुलगी हेही तिला कळले नाही. नंदबाबा, दास, दासी, पाहरेकरी सारे निदेच्या अधीन झाले होते. वसुदेव यशोदामाई जेथे होत्या तेथे पोहोचले. भगवंताला यशोदामाईच्या कुशीत ठेवून दिले आणि बालिकारूपी योगमायेला उचलून घेतले. वसुदेव आपल्या मनाशी म्हणाले – अजूनही आपले प्रारब्धकर्म बाकी राहिले आहे. म्हणूनच तर भगवंताला सोडून मायेला गळय़ाशी धरण्याचा प्रसंग आला आहे.

वसुदेव योगमायेला टोपलीत बसवून परत कंसाच्या कारागृहात पोचले. प्रभूस्पर्श झाल्यावर सगळीच बंधने तुटून गेली होती. आता माया आली तर सर्वच बंधने आली. वसुदेव गोकुळांतून मायेला आपल्या डोक्मयावर बसवून घेऊन आले म्हणून बंधनेही आली. मायेसह वसुदेव कारागृहात येताच कारागृहाची दारे बंद झाली आणि वसुदेवीच्या पायात पुन्हा बेडय़ा पडल्या.

जीव जेव्हा भगवंताचा आश्रय घेतो, तेव्हा सारी बंधने तुटतात. आणि जेव्हा भगवंताला सोडून तो मायेला पकडतो तेव्हा पुन्हा बंधनात बांधला जातो. कारण माया बांधणारी, अडकवणारी आहे. तर भगवंत सोडवणारे, मुक्त करणारे आहेत. मायेच्या पार जाणे फार अवघड आहे.

कंसाच्या कारागृहात पोहोचतात भगवंताच्या योगमायेने आपले प्रताप दाखवायला सुरुवात केली. ती कन्या इतक्मया मोठमोठय़ाने आक्रंदून रडू लागली की सर्व पहारेकरी खडबडून जागे झाले. गोकुळात ही यशोदामाईच्या कुशीत शांत झोपली होती. वसुदेवांनी हीला उचलून टोपलीत घातली, तरी ही शांत झोपलेलीच होती. वसुदेव हीला डोक्मयावर घेऊन पुन्हा यमुनापार आले, तरीही हीला जाग आली नाही. पण वसुदेव हीला घेवून कंसाच्या कारागृहात पोहोचताच हीने आपल्या नाटय़ प्रवेशास सुरुवात केली व ही रडू लागली. पहारेकरी खडबडून जागे झाले, भानावर आले. त्यांच्या लक्षात आले की आपल्याला गाढ झोप लागली होती. त्यांना आश्चर्य वाटले की अशी कशी आपल्याला एवढी गाढ झोप लागली आणि तिही सर्वांना, एकदम, एकाच वेळी! आता कंस महाराज संतापतील म्हणून ते घाबरले आणि कंसाला समाचार देण्यासाठी धावले. पुढील कथा नामदेवराय वर्णन करतात – तांतडीनें जाती । कंसा सेवक सांगती । उपजला वैरी। त्यासी तूं रे त्वरें मारी ।  त्वरें धांव घाली । पाहे कन्या उप­ जली । ज्याचा धोका तूज । नव्हे कन्या द्यावी मज ।  मारायाशीं खड्?ग घाली । हातिंची सुटूनियां गेली । तुजलागीं वधी । उपजला मज आधीं । सांगे ब्रह्मज्ञान । देवकीचें समाधान ।  नामा म्हणे तयेवेळीं । त्यांचीं बंधनें काढिलीं ।

– ऍड. देवदत्त परुळेकर