|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शेळीपालनासाठी जिह्यात पोषक वातावरण!

शेळीपालनासाठी जिह्यात पोषक वातावरण! 

वेताळबांबर्डे येथे शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण

वार्ताहर / कणकवली:

सिंधुदुर्ग जिह्यातील पोषक वातावरणात शेळीपालन हा व्यवसाय फायदेशीर आहे. कृषीपूरक असलेला हा व्यवसाय आहे. जिह्यातील लोकांना याचा लाभ घेता यावा, या अनुषंगाने परिवर्तन केंद्र व संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने वेताळबांबर्डे येथे नुकतेच शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. प्रसाद सावंत यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत शेळीपालनाचे फायदे पटवून दिले.

शेळीपालन करताना अवलंबायच्या विविध पद्धती, शेळ्य़ांच्या जातीची निवड, शेळ्य़ांचे व्यवस्थापन, शेळीघर, बंदिस्त शेळी पालनाचे फायदे, लहान करडांचे संगोपन, शेळ्य़ांची विण्यापूर्वी व नंतर घ्यायची काळजी, पैदाशीच्या बोकडांची निवड व त्यांचे व्यवस्थापन, शेळ्य़ांचा आहार, त्याचे महत्त्व, शेळ्य़ांचे आजार, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय आदींबाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेळी प्रकल्पाला भेट देत माहिती देण्यात आली.

प्रशिक्षणात डॉ. प्रसाद सावंत, दिनेश राणे, संकल्प प्रतिष्ठानचे मुरादअली शेख आदींनी मार्गदर्शन केले. संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिह्यात सुशिक्षीत बेरोजगार, महिलांना, शेतकऱयांना उद्योग व्यवसाय करण्याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुरादअली शेख यांनी यावेळी सांगितले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी संस्था सचिव अमोल भोगले यांनी सहकार्य केले.

Related posts: