|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘शिवराय’ जाणून घेण्यासाठी ‘जाणता राजा’द्वारे संधी

‘शिवराय’ जाणून घेण्यासाठी ‘जाणता राजा’द्वारे संधी 

महापौर संज्योत बांदेकर यांचे मत

बेळगाव/ प्रतिनिधी

‘जाणता राजा’ या महानाटय़ाच्या माध्यमातून युवापिढीला शिवरायांचे चरित्र जाणून घेण्यास मोलाची मदत होणार आहे. त्यामुळे या महानाटय़ाचे प्रयोग निश्चितच यशस्वी होतील, अशी सदिच्छा महापौर संज्योत बांदेकर यांनी व्यक्त केली.

‘जाणता राजा’ महानाटय़ाची मुहूर्तमेढ बुधवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत रोवण्यात आली. येथील सीपीएड् मैदानावर दि. 9 ते 13 डिसेंबर या कालावधीत हे महानाटय़ सादर होणार आहे. या निमित्ताने हा मुहूर्तमेढ समारंभ झाला. यावेळी पाहुण्या म्हणून महापौर संज्योत बांदेकर यांच्यासह तरुण भारतचे कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष साजिद शेख, उपमहापौर नागेश मंडोळकर, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्या निरंजना अष्टेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

जाणता राजा महानाटय़ाचा प्रयोग तब्बल 12 वर्षांनंतर बेळगावात होत आहे. बेळगावकर शिवप्रेमींसाठी ही एक मोलाची पर्वणी ठरणार आहे. तरुण भारत आणि लोकमान्य परिवाराकडून उपलब्ध अशा या संधीची उपयुक्तता समाजासाठी निश्चित सार्थ ठरेल, असा विश्वास प्रसाद ठाकुर यांनी व्यक्त केला.

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष साजिद शेख यांनीही यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते मुहूर्तमेढ पूजन आणि श्रीफळ वाढवून शामियाना उभारणीच्या कामाचा मुहूर्त करण्यात आला. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी मनपा गटनेते पंढरी परब, माजी महापौर किरण सायनाक, नगरसेवक ऍड. रतन मासेकर, महेश नाईक, मोहन बेळगुंदकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य रिझवान बेपारी, किरण गावडे, अल्लादिन किल्लेदार, नगरसेविका सुधा भातकांडे, रुपा नेसरकर, माया कडोलकर आदी उपस्थित होते.

लोकमान्य को-ऑप. सोसायटीचे ज्ये÷ संचालक सेवंतीभाई शाह, प्रभाकर पाटकर, अजित गरगट्टी, विठ्ठल प्रभू, गजानन धामणेकर, सुबोध गावडे, सीईओ अभिजीत दीक्षित, समन्वयक विनायक जाधव आदी उपस्थित होते. तरुण भारत ट्रस्टचे विश्वस्त वसंत सामंत, विवेक कामत, नितीन कपिलेश्वरकर, जाणता राजाचे दिग्दर्शक योगेश शिरोळे, निशांत जाधव, परशुराम माळी, कंत्राटदार रणजीत मन्नोळकर, प्रदीप कुलकर्णी, आर्किटेक्ट उमेश सरनोबत आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. माधव कुंटे यांनी पौरोहित्य केले. अनिल चौधरी यांनी सूत्रसंचालन तर जगदीश कुंटे यांनी आभार मानले.

Related posts: