|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News » परप्रांतीय लोकांनी मुंबईच्या वैभवात भर घातली ; देवेंद्र फडणवीस

परप्रांतीय लोकांनी मुंबईच्या वैभवात भर घातली ; देवेंद्र फडणवीस 

ऑनलाईन टीम / मुंबई :

उत्तर भारतीय आणि अन्य राज्यातून येणाऱया लोकांनी महाराष्ट्राच्या वैभावात भर घातली आहे. परप्रांतातून आलेल्या लोकांनी आपले योगदान देऊन मुंबईला महान बनवले, मुंबईचा गौरव वाढवला असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री केले आहे.

घाटकोपर स्टेशन रोडवरील चौकाचे शिक्षणमहर्षी आय.डी.सिंह असे नामकरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी त्यांनी सिंह यांच्या कार्याचा गौरव केला.हिंदी हायस्कूलच्या बैजनाथ साबू सभागृहात हा कार्यक्रम झाला. आय.डी.सिंह यांचे जीवन शिस्तबद्ध होते. त्यांनी हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.त्यांच्या प्रयत्नामुळे आज हिंदी विद्या प्रचार सभेच्या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. उत्तर भारतीयांनी मुंबईच्या लौकिकात आपल्या कार्याने भरच घातली आहे,असे फडणवीस यांनी सांगितले.

 

 

 

 

Related posts: