|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नराधम आजोबाचा चिमुरडीवर अत्याचार

नराधम आजोबाचा चिमुरडीवर अत्याचार 

प्रतिनिधी /इचलकरंजी :
अल्पवयीन मुलीवर आजोबानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रांगोळी (ता. हातकणंगले) येथे मंगळवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी पोपट सदाशिव घराळ (वय 50, रा. रांगोळी) या नराधमास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी, पीडित मुलगी हि दुसरीच्या वर्गात शिकत असून रांगोळी येथे आई वडिल व तीन भावंडासोबत राहण्यास आहे. पीडित मुलीची आजी हि रांगोळी गावानजीकच असलेल्या मुल्लाणीवाडी येथे भाडय़ाच्या घरात राहते. पीडित मुलगी आपल्या भावंडांसोबत दर रविवारी आजीकडे जात असे. रविवार (26) रोजी पीडित मुलगी आजीकडे गेली होती. यावेळी तब्येत ठिक नसल्यामुळे पीडित मुलगी आजीच्या घरी झोपली होती. यावेळी त्या मुलीचे भावंडे आजीसोबत घराजवळच्या शेतात गेले होते. याचदरम्यान आजीच्या बहिणाचा पती पोपट घराळ हा दुपारी तीनच्या सुमारास घरी आला. त्याने एकटय़ा असणाऱया चिमुरडीवर अत्याचार केला. यावेळी पीडितेची आजी घरी असली असता, तिच्या लक्षात हा प्रकार आला. याबाबतची फिर्याद आजीने दि.28 रोजी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांत दिली. पोलिसांनी घराळ याला रात्री उशिरा अटक केली.