|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘ओक्खी’ चक्रीवादळ कोकणकिनारपट्टीकडे सरकतेय

‘ओक्खी’ चक्रीवादळ कोकणकिनारपट्टीकडे सरकतेय 

प्रतिनिधी /रत्नागिरी

केरळच्या किनाऱयावर उसळलेले ‘ओक्खी’ चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीकडे सरकत असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील सर्व मच्छीमार बांधवांना सावध राहण्याचा इशारा येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त विभागाने दिला आहे.

केरळला ‘ओक्खी’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. हे चक्रीवादळ अरबीसमुद्रात पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे या किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिह्याच्या किनापट्टीवरील सर्व मच्छीमारांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related posts: