|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » उद्योग » 1.1 लाख परवडणाऱया घरांना केंद्र सरकारकडून मंजुरी

1.1 लाख परवडणाऱया घरांना केंद्र सरकारकडून मंजुरी 

1,681 कोटी रुपयांची सरकारकडून गुंतवणूक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 1,12,083 परवडणाऱया घरांची उभारणी करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली. यासाठी 8,105 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार असून सरकारकडून 1,681 कोटी रुपयांची मदत करण्यात येईल. नागरी भागात सरकारकडून परवानगी देण्यात आलेल्या घरांची संख्या आता 30,52,828 वर पोहोचली आहे.

मध्य प्रदेशसाठी सर्वाधिक घरांना मंजुरी देण्यात आली. या राज्यातील 25 शहरे आणि गावांमध्ये 34,680 घरांना परवानगी मिळाली आहे. यानंतर झारखंडमधील पाच शहरे आणि गावातील 28,447 घरांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 2,080 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल. हरियाणातील 28 शहरे आणि गावांसाठी 24,221 घरे उभारण्यात येणार असून 1,721 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. महाराष्ट्रात 860 कोटीच्या गुंतवणुकीने 11,523 घरे, केरळमध्ये 295 कोटीच्या गुंतवणुकीने 9,836 घरे, मिझोरममध्ये 65 कोटीच्या गुंतवणुकीने 3,270 घरे बांधण्यात येतील.

बीएलसी प्रकारात 44,692 घरे बांधण्यास मंजुरी देण्यात आली. गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयाने झारखंडमध्ये 28,477, हरियाणामध्ये 13,946 आणि महाराष्ट्रात 6,392 घरे भागीदारीने उभारण्यात परवानगी दिली. 2022 पर्यंत सर्व नागरिकांना घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Related posts: