|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » खैरलांजी हत्याकांडातील आरोपीचा मफत्यू

खैरलांजी हत्याकांडातील आरोपीचा मफत्यू 

नागपूर :

देशभरात खळबळ उडवून देणाऱया खैरलांजी हत्याकांडातील आरोपी विश्वनाथ धांडे याचा उपचारादरम्यान मफत्यू झाला. 65 वर्षीय धांडे गेल्या 9 वर्षांपासून मध्यवर्ती कारागफहात बंदिस्त होता.

खैरलांजी हत्याकांड भंडारा जिल्हय़ातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात 29 सप्टेंबर 2006 ला घडले होते. तत्कालीन राज्य सरकारने जनभावना लक्षात घेत जलदगती न्यायालयात या खटल्याची सुनावणी होणार असे जाहीर केले होते. राज्यभर आंदोलनांचे लोण उसळल्यानंतर सुमारे 7 महिन्यांनी न्यायालयात दाखल झालेल्या आणि दीड वर्ष चाललेल्या या हत्याकांडाचा निकाल 15 सप्टेंबर 2008 रोजी लागला.

भंडारा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार 11 पैकी गोपाल सक्रू बिंजेवार, सक्रू बिंजेवार, शत्रुघ्न धांडे, विश्वनाथ धांडे, प्रभाकर मंडलेकर, जगदीश मंडलेकर, रामू धांडे आणि शिशुपाल धांडे या आ” आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली तर महिपाल धांडे, धर्मपाल धांडे आणि पुरुषोत्तम तितीरमारे यांना मुक्त केले.

दरम्यान, विश्वनाथ धांडे हा 9 वर्षांपासून नागपूरच्या मध्यवर्ती कारागफहात बंदिस्त होता. बुधवारी दुपारी 3.30 च्या सुमारास त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी उशिराने डॉक्टरांनी धांडेला मफत घोषित केले. या हत्याकांडात शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मफत झालेला धांडे हा दुसरा आरोपी होय, अन्य आरोपींपैकी जगदीश मंडलेकर हा 2012 मध्ये मफत झाला.

Related posts: