|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विजय माळी यांना रोहमारे पुरस्कार

विजय माळी यांना रोहमारे पुरस्कार 

प्रतिनिधी/ कराड

ग्रामीण साहित्यासाठी गेल्या 28 वर्षांपासून दिला जाणारा प्रतिष्ठित भि. ग. रोहमारे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कार कराडचे साहित्यिक विजय शं. माळी यांच्या ‘आर्त माझ्या बहु पोटी’ या ग्रंथाली मुंबई प्रकाशित कादंबरीस जाहीर झाला आहे.

7 रोजी ज्येष्ठ कवी व समीक्षक डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते व ज्येष्ठ विचारवंत बी. जी. कोळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण कोपरगाव (जि. नगर) येथे कै. जे. सोमैया महाविद्यालयात सकाळी 10 वाजता होणार आहे.

5001 रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या आधीही माळी यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या नावावर दोन कथासंग्रह, एक कविता संग्रह, एक ललितगद्य संग्रह, एक कादंबरी व एक इतिहासपर अशी सहा पुस्तके आहेत. कथासंग्रहाच्या दोन आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या पहिल्या दोन पुस्तकांची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या प्रकाशन अनुदानासाठी निवड झाली आहे.

Related posts: