|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिल्हय़ात दरवर्षी 200 जणांचा मौखिक कॅन्सरने बळी

जिल्हय़ात दरवर्षी 200 जणांचा मौखिक कॅन्सरने बळी 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हय़ात तंबाखू व गुटखा या अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे मौखिक कर्करोगाच्या आजारामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये तरूणाई मोठय़ा प्रमाणात अडकू लागली असून जिल्हय़ात दरवर्षी दोन ते तीन हजार व्यक्तींना मौखिक पॅन्सरची लागण होत आहे. तर दरवर्षी 200 जणांचा मृत्यू होत आहे. सध्या मौखिक कर्करोग विरोधी अभियान दि. 1 ते 31 डिसेंबर दरम्यान जिल्हय़ात राबवले जाणार आहे. या अनुषंगाने पुढे येत असलेल्या या माहितीवरून कर्करोगाचा विळखा सातारा जिल्हय़ात पडू लागल्याचे दिसत आहे.

 आजकालची तरूणाई व्यसनाधिनतेकडे फारच वळत चाललेली आहे. अंमली पदार्थांच्या किंमती कितीही वाढल्यातरी व्यसन करणाऱयांच्या संख्येत घट होत नाही. अंमली पदार्थाची मागणी वाढतच चाललेली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासुन ते अगदी शासकीय कर्मचाऱयांपर्यंत अंमली पदार्थांचे सेवन करणारे बरेच आहेत.   सर्व ठिकाणी शासकीय कार्यालय, खासगी कार्यालय, बसस्थानक परिसर, महाविद्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणी यामध्ये अंमली पदार्थांचे सेवन करून पिचकाऱया मारलेल्याचे चित्र दिसते. कार्यालयाच्या जिन्यामध्ये सुद्धा अशा पिचकाऱया मारल्या जातात. गुटखा, तंबाखू खाल्यामुळे आजपर्यंत अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.तर अनेकजण आजाराने पिडीत आहेत.

शुक्रवारपासून शासकीय कार्यालयात तपासणी सुरू

सातारा जिल्हय़ात शुक्रवारपासुन सर्व शासकीय कार्यालयात जावून मौखिक कर्करोगाची तपासणी करण्याचे काम जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या अंतर्गत चालू करण्यात आले आहे. यानंतर जनतेसाठी रोज डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हय़ातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय आणि जिल्हा रूग्णालयामध्ये होणार आहे. तपासणी झाल्यानंतर कर्करोगाचा रूग्ण आढळल्यास रूग्णाचा उपचार मोफत केला जाणार आहे.

मुख कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. यामध्ये तरूणांची संख्या मोठय़ा प्रमाणात पहायला मिळत आहे. दरवर्षी तोंडाचा कर्करोग झालेले अनेक रूग्ण आढळतात. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाले आहेत. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन आणि होणाऱया तोंडाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या वतीने डिसेंबर या महिन्यात संपूर्ण जिल्हय़ातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. कर्करोग मुख्यतः तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हेत असतो. तोंडाचा कर्करोग हा गाल, जीभ, ओठ, टाळू, हिरडय़ा, जीभेखालील भाग अशा भागात होत असतो. तेंडाच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी हे अभियान डिसेंबर या महिन्यात राबविण्यात येत आहे. ही तपासणी जिल्हय़ातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रूग्णालय आणि जिल्हा रूग्णालयामध्ये होणार असल्याची माहिती वैद्यचिकित्सक डॉ. भोई यांनी दिली.

गुटखा बंदी असताना खुलेआम विक्री…

जिल्हय़ात गुटखा बंदी असताना अनेक छोटय़ा मोठय़ा टपरीमध्ये अंमली पदार्थांची विक्री केली जाते. शाळा, महाविद्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या परिसरातील टपरीमध्ये अंमली पदाथांची विक्री चालूच आहे. ज्याप्रमाणे सध्या मटका अड्डय़ावर छापे टाकले जात आहेत त्याचप्रमाणे टपरीवर अंमली पदार्थ विक्री केली जाते यावरही पोलिसांनी छापे टाकावते. कर्करोगाच्या निर्मुलनासाठी कोटय़वधी रूपये खर्च केले जाते पण ज्यापासून हा आजार होतो त्याची विक्रीच होवू नये यासाठी शासनाकडून उपाययोजना होत नाहीत. केवळ कागदोपत्री आदेश काढून अधिकारी  ‘मसाला’ खावून आपले तोंड लाल करत आहेत.

Related posts: