|Saturday, June 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘स्वच्छ भारत योजने’चे पथक बेळगावात

‘स्वच्छ भारत योजने’चे पथक बेळगावात 

प्रतिनिधी / बेळगाव

स्वच्छ भारत योजना प्रभावीपणे राबविण्यात बेळगाव तालुका अग्रेसर आहे.  शौचालयांची बांधणी करुन हागणदारीमुक्त तालुका करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुरेपूर प्रयत्न केले आहेत. याची दखल केंद्र सरकारने घेतली असून स्वच्छ भारत योजनेचे केंद्र सरकारने एक पथक बेळगाव तालुक्मयात आले आहे. त्या पथकाने  शुक्रवारी बेळगाव तालुक्मयातील विविध गावांना भेटी देवून कामाची पाहणी करुन अधिकाऱयांचे अभिनंदन केले आहे. यावेळी कामाचा तपशीलही त्यांनी जाणून घेतला.  

 

बेळगाव तालुक्मयातील भेंडीगेरी, आंबेवाडी ग्राम पंचायतींना भेटी देवून तेथील माहिती जाणून घेतली आहे. प्रत्येक घराघरात शौचालये आहेत की नाही, याची चाचपणी यावेळी करण्यात आली. केंद्र सरकारने राबविलेली ही योजना बेळगाव तालुक्मयातील गरीबांपर्यंत पोहोचली आहे की नाही? याचीही पाहणी त्यांनी केली. यावेळी अधिकारी व सामान्य जनतेच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या.

 

तालुक्मयातील बहुसंख्य गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. याबाबतचा अहवाल अधिकाऱयांनी या पथकाला दिला आहे. कामाचा लेखाजोखा पाहून केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले. यापुढेही अशा प्रकारेच कामे करुन स्वच्छ भारत अभियान ही योजना, यशस्वी करा, असे या केंद्रीय पथकाने अधिकाऱयांना सांगितले. सध्याच्या कामकाजाबद्दल पथकाने समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, विकास कार्यदर्शी एस. बी. मुळ्ळोळी, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी ए. एस. हालसोडे, साहाय्यक वसंत दिंडोर आदी उपस्थित होते.

Related posts: