|Thursday, July 19, 2018
You are here: Home » Top News » मनसे नेते संदीप देशपांडेसह इतर आठ जणांना पोलिस कोठडी

मनसे नेते संदीप देशपांडेसह इतर आठ जणांना पोलिस कोठडी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह आठ जणांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर मनसेने सर्जिकल स्ट्राईक केला,असे सांगत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर पोलिसांनी देशपांडे यांना ताब्यात घेतले होते.त्यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर दंगल,घुसखोरी आणि नासधूस या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.या हल्ल्यानंतर काँग्रेस-मनसेमध्ये वाकयुद्ध सुरू झाले होते.त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीही काँग्रेस पक्षाच्या वांद्रे येथील कार्यालयावर अज्ञात व्यक्तींकडून शाईफेक करण्यात आली. यामागेही मनसेचा हात असण्याची शक्यता आहे.याशिवाय ,संजय निरूपम यांच्या घराबाहेर मनसेकडून होर्डिंग्ज लावण्यात आले होते. यात निरूपम यांचे व्यंगचित्र रेखाटत त्यांचा उल्लेख परप्रांतीय भटका कुत्रा असा केला आहे.त्यामुळे आगामी काळात काँग्रेस आणि मनसेमधील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

Related posts: