|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लातूर-निलंगा रस्त्यावर पंधरवडय़ातील तिसरा अपघात

लातूर-निलंगा रस्त्यावर पंधरवडय़ातील तिसरा अपघात 

प्रतिनिधी/ लातूर

लातूर-निलंगा रस्त्यावर शुक्रवारी रात्री उशिरा 11.50 वाजता एसटी व ट्रकचा अपघात झाला यात तिघे जागीच ठार झाले असून, 8 जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या 15 दिवसात एकाच रस्त्यावर झालेला हा तिसरा अपघात आहे शुक्रवारी रात्री 11.10 वाजता लातूर-हैदराबाद जाणारी एसटी लातूर बसस्थानकावरून निघाली. औसाच्या पुढे आल्यानंतर चलबुर्गा फाटय़ाजवळ 11.50 च्या सुमारास (एसटी क्र. एमएच 20, 3587) व ट्रक क्रमांक (एपी 24 व्ही 8838) यांची धडक झाली.

यामध्ये अंकिता अमित भोज (33 रा. दापका वेस, निलंगा) यांच्यासह तिघे ठार झाले. अन्य दोघांची नावे कळू शकली नाहीत तर जखमींमध्ये अमित भोज गंभीर असून, दीपक गुंडेवार नाईक, दीपाली दीपक नाईक, गिरीश गुंडेवार नाईक, नागनाथ कलप्पा हंसराळे यांच्यासह काही जण किरकोळ जखमी आहेत. त्यांना लातूरहून येणारे ईश्वर पाटील यांनी आपल्या वाहनातून निलंगा येथे उपचारासाठी आणले. तसेच अन्य जखमींना लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात हलविले आहे.

घटनास्थळी किल्लारीचे सपोनि भोसले तातडीने पोहोचले. लातूर ते निलंगा या रस्त्यावर गेल्या पंधरा दिवसातील हा तिसरा मोठा अपघात आहे. 18 नोव्हेंबर 2017 रोजी एसटी-ट्रकच्या अपघातात 7 जण जागीच ठार झाले होते तर 26 नोव्हेंबर रोजी याच परिसरात झालेल्या कार अपघातात तिघे ठार झाले होते. अपघात प्रवण क्षेत्र बनलेल्या औसा ते निलंगा दरम्यान, अनेक ठिकाणी हा रस्ता जम्पिंग आहे. त्यामुळे नियमित किरकोळ अपघात होतात.

Related posts: