|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बस स्थानकांच्या दारात एसटी पडली बंद

बस स्थानकांच्या दारात एसटी पडली बंद 

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील एसटी बस स्थानंकाच्या दारात एसटी बस अचानक बंद पडल्याने ट्रफिक जाम झाले होते. ही बाब बस प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच मेकानिक बोलवून ही बस जागीच दुरूस्त केली आणि पण यामुळे अर्धा तास एसटी बस जाग्यावर उभी राहिल्याने वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. अशा एसटी बस शहरात वारंवार बंद पडत असतात.

एसटी बस बंद पडण्याची चित्रे शहरात नवीन नाहीत दिवसभरातून एकदा तरी शहरात बस कुठे तरी बंद पडलेली असते. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शनिवारी तर बस स्थानकांच्या दाराताच एसटी बस बंद पडली यामुळे दुसऱया बस जाग्यावर थांबल्या, तसेच इतर वाहनांना जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता. अर्धा तास बस जागेवर उभे रहिल्याने ट्रफिक जाम  झाले होते. ही बाब बस प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यांनी मेकानिकला पाठून बस जागेवर दुरूस्त करून घेतली. अशा घटनांकडे बस प्रशासन गंभीर्याने पाहत नाही. यामुळे इतर प्रवासी वाहनांना त्रास सहन करावा लागत नाही. 

 

Related posts: