|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ईद-ए-मिलाद उत्साहात

ईद-ए-मिलाद उत्साहात 

प्रतिनिधी / बेळगाव

ईद-ए-मिलाद हा सण बेळगाव आणि परिसरातील मुस्लीम बांधवांनी शनिवारी उत्साहात साजरा केला. शहर आणि उपनगरी भागात मिरवणूक काढून एकमेकाला शुभेच्छा देत सणाचा आनंद लुटण्यात येत होता.

शनिवारी सकाळपासूनच मुस्लीम बांधवांची गर्दी होत होती. सामुदायिक नमाज पठणानंतर पारंपरिक वेशभूषेमध्ये मुस्लीम बांधव दाखल होत होते. वेगवेगळय़ा गल्ल्या आणि मोहल्ल्यांच्या माध्यमातून मिरवणुकीत सहभागी होत दुपारपर्यंत सणाचा आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न सुरू होता. अनगोळ आणि टिळकवाडी विभागातही मिरवणुकीने ईद साजरी झाली. वेगवेगळय़ा भागातून मुस्लीम बांधव बेळगाव शहरात दाखल झाले होते. सायंकाळपर्यंत हा उत्साह सुरू होता. शुक्रवार दि. 1 पासून सुरू झालेला हा सण शनिवारी समाप्त करण्यात आला.   

Related posts: