|Thursday, October 18, 2018
You are here: Home » Top News » मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक

मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक 

ऑनलाईन  टीम / मुंबई  :
 मुंबईतील  मध्य आणि हार्बर मार्गावर आज  मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला  आहे . तमध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

 मध्य रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येईल.त्यामुळे मेगाब्लॉक काळात जलद मार्गावरील लोकल फेऱ्या ठाण्यानंतर डाऊन धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहेत.

 

Related posts: