|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » ऍडलेडमध्ये दिवस-रात्रीची कसोटी खेळण्यास भारत उत्सुक

ऍडलेडमध्ये दिवस-रात्रीची कसोटी खेळण्यास भारत उत्सुक 

वृत्तसंस्था/ ऍडलेड

ऑस्ट्रेलियातील ऍडलेड मैदानावर प्रकाशझोतामध्ये दिवस-रात्रीची कसोटी खेळण्यास विराट कोहलीचा भारतीय संघ उत्सुक आहे. 2018 च्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात उभय संघांत मेलबोर्न, सिडनी, पर्थ आणि ऍडलेड येथे सामने खेळविले जातील, अशी आशा आहे.

ऍडलेडच्या मैदानावर सलग तिसऱया वर्षी दिवस-रात्रीची कसोटी खेळविली जात आहे. ऍशेस मालिकेतील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी ऍडलेडमध्ये दिवस-रात्रीची होत असून या कसोटीला प्रेक्षकांची विक्रमी उपस्थिती होत आहे. पुढील वर्षी भारताबरोबर या ठिकाणी होणारी कसोटी दिवस-रात्रीची खेळविण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून होकाराची अपेक्षा आहे.

Related posts: