|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » बार्सिलोनाचा सामना बरोबरीत

बार्सिलोनाचा सामना बरोबरीत 

वृत्तसंस्था / नोयु कॅम्प

ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या सामन्यात सेल्टा संघाने बार्सिलोनाला 2-2 असे गोल बरोबरीत रोखले. या सामन्यात बार्सिलोनाच्या मेस्सीला गोल करण्याची संधी लाभली.

या सामन्यातील 20 व्या मिनिटाला ऍसपेसने सेल्टाचे खाते उघडले. अर्जेंटिनाचा हुकमी फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीने 22 व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते उघडून बरोबरी साधली. या वर्षीच्या फुटबॉल हंगामातील या लीग स्पर्धेत मेस्सीचा हा 13 गोल आहे. 63 व्या मिनिटाला लुईस सुवारेंझने बार्सिलोनाचा दुसरा गोल केला पण सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना गोमेंझने सेल्टाचा दुसरा गोल करून हा सामना बरोबरीत सोडविला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात बार्सिलोनाचा संघ 36 गुणांसह पहिल्या स्थानावर असून व्हॅलेन्सिया दुसऱया स्थानावर आहे. ऍटलेटिको माद्रीद 27 गुणांसह तिसऱया स्थानावर आहेत.