|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न झाल्यास बेमुदत उपोषण

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न झाल्यास बेमुदत उपोषण 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

अतिरिक्त एकूण शिक्षकांपैकी 20 शिक्षकांचे समायोजन करून घेतले आहे. मात्र आणखी 76 अतिरिक्त शिक्षकांना मुख्याध्यापक हजर करून घेत नाहीत. तरी सर्व अतिरिक्त शिक्षकांचे त्वरीत समायोजन करून घ्यावे. 15 डिसेंबरपर्यंत शिक्षकांचे समायोजक करून न घेतल्यास बेमुदत उपोष करू, असा इशारा,  निवेदनाव्दारे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघातर्फे जिल्हा पीरषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना देण्यात आला.

निवेदनात म्हंटले आहे, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी व या विभागातील अधिकाऱयांनी शाळांना प्रत्यक्ष भेटी देवून अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेण्याच्या सूचना द्यावा. अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनप्रश्नी योग्य तो निर्णय घेवून हजर करून न घेणाऱया शाळांवर योग्य ती कडक कारवाई करावी.  अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी न लागल्यास उपोषण करू, असा इशाराही देण्यात आला. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष आयरे, के. ए. पाटील, दत्तात्रय चौगले, नामदेव पाटील, रविंद्र गुरव, आण्णाप्पा कुंभार, बाजीराव गोंगाणे, शिवाजी चौगुले, सुकुमार आडके, सुहास प्पोवार, मेघा मोरे, विद्या पाटील, आदी उपस्थित होते.  

Related posts: