|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ऍपेरिक्षा-डंपरची धडक, बालक ठार, पाच गंभीर

ऍपेरिक्षा-डंपरची धडक, बालक ठार, पाच गंभीर 

लाटवाडी -बोरगाव मार्गावर अपघात

वार्ताहर / अब्दूललाट

डंपर व रिक्षा अपघातात तीन वर्षीय बालक ठार झाले तर पाच जण गंभीर जखी ^झाले. अब्दूललाट (ता. शिरोळ) येथील लाटवाडी-पाचवामैल रस्त्यावर रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. महंमद फिरोज मुल्ला (वय 5) असे मृत बालकाचे नाव आहे. तर हसन हारूगिरे (वय 55), राबिया हसन हारूगिरे (45), उमर फारूक हारूगिरे (वय 25), हुजेपा हारूगिरे (वय 22), आसमा फिरोज मुल्ला (वय 24) हे गंभीर जखमी झाले आहेत.

अब्दूललाट येथील हसन हारूगिरे हे कुटुंबीयांसह स्वमालकीच्या ऍपेरिक्षाने सदलगाकडे पाहुण्यांच्याकडे जात होते. बोरगावहून लाटवाटीच्या दिशेने ज्योती स्टोन क्रशरचा डंपरजात होता. पाचवा मैलजवळील देवमोरे मळ्याजवळ ऍपेरिक्षा व डंपरची समोरासमोर धडक झाली. रिक्षामधील बालक महमंद मुल्ला जागीच ठार झाला.  हसन, रबिया, फारुक, हुसेबा व आस्मा हे गंभीर जखमी झाले. यांना तातडीने कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आस्मा यांचे सासर कोल्हापूर असून त्या माहेरी आपला मुलगा महमदला घेऊन आल्या होत्या. त्यांच्या मुलावर काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने रिक्षाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, डंपर चालक फरारी झाला आहे.  आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, उपसरपंच वृषभ कोळी, शंकर पाटील, पोलीस पाटील मानसिंग भोसले आदींनी घटनास्थळी भेट दिली.

Related posts: