|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बोणबाग – बेतोडा येथे अपघातात कारचालक ठार

बोणबाग – बेतोडा येथे अपघातात कारचालक ठार 

मालवाहू ट्रक आणि स्वीफ्ट कारची समोरासमोर धडक

प्रतिनिधी/ फोंडा

बोणबाग-बेतोडा, फेंडा येथे बेतोडा-बोरी बगलरस्त्यावर झालेल्या चारचाकी व मालवाहू ट्रकच्या अपघातात चारचाकीचालकांचा जागीच मृत्यू झाला. अनिल राजाराम कुलकर्णी (55, रा. सिल्वानगर फोंडा, मुळ पुणे) असे त्याचे नाव आहे. सदर अपघात काल  रविवारी सायंकाळी 7 वा. सुमारास घडला.

प्राप्त माहितीनुसार मयत अनिल कुलकर्णी हे आपल्या स्विफ्ट जीए 07 ई 0284 या चारचाकीने सुट्टीवर आलेल्या मुलांना स्टेशनवर सोडल्यानंतर मडगावहून बोरीमार्गे घरी येत होते. बोणबाग बेतोडा येथील ग्लिम्स ऑफ इंडियाजवळ असलेल्या वळणावर पोचले असता उसगांवहून मडगावमार्गे येणाऱया मालवाहू ट्रकने केए 25 बी 2220 चारचाकीला समोरासमोर धडक दिली. दोन्ही वाहनाच्या चालकाच्या बाजूलाच धडक लागली. धडक एवढी जबरदस्त होती ट्रकच्या धडकेत स्विफ्टचा दर्शनी भाग आत सरकल्याने चालकाला हालचाल करता आली नाही. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. अपघातानंतर ट्रकचालकाने चारचाकीच्या चालकाला सहकार्य करण्याचे सोडून तिथून पळ काढला.

तिथून प्रवास करणाऱयानी बचावासाठी अग्निशामक दलाला पाचारण केले. तोपर्यत लोकांनी त्यांची सुटका करून त्याला फेंडा येथे उपजिल्हा इस्तितळात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

कुलकर्णी कुटुंब झाले पोरके  

अनिल कुलकर्णी हे ग्रहस्थ मनमिळावू स्वभावाचे म्हणून होते. वेर्णा येथील आयएफबी या आस्थापनात अधिकारी म्हणून कामाला होते. ते कामानिमित्त मुंबई येथे असलेल्या मुलांला व पुणे येथे पोस्ट ग्रेज्युएटचे शिक्षण घेत असलेल्या मुलीला स्टेशनवर सोडण्यासाठी गेले होते. आपल्या मुलीला फोंडा बसस्थानकावर व त्यानंतर मुलाला मडगाव येथे सोडून ते घरी परतत असताना त्याच्यावर काळाने झडप घातली. शेजारी मित्राने विनंती केली होती आपण मुलीला सोडून येतो तुम्ही मुलाला सोडून या. त्याचे म्हणणे ऐकले असते तर ही वेळ आली नसती असे सांगताना आपला शेजारी व मित्रा गमावल्याने ते भावूक झाले. तीन वर्षापुर्वीच अनिलच्या पत्नीचे आजाराने निधन झाले होते. आईच्या निधनानंतर सावरत असलेल्या कुलकर्णी कुठूबांचा आधार असलेल्या वडिलांच्या अपघाती मृत्यूमुळे अंभिरीष व अनुजा हे पोरके झाले आहे.

याप्रकरणी फेंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. ट्रकचालक महंतेश पंपनवार (30,धारवाड) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मृतदेह फेंडा येथे उपजिल्हा इस्पितळाच्या शवागरात ठेवण्यात आला असून उपनिरीक्षक अरूण भाक्रे अधिक तपास करीत आहे.  

Related posts: