|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुठ्ठाळीत अवजड क्रेन कोसळल्याने मडगाव पणजी मार्गावर साडे तीन तास कोंडी

कुठ्ठाळीत अवजड क्रेन कोसळल्याने मडगाव पणजी मार्गावर साडे तीन तास कोंडी 

प्रतिनिधी/ वास्को

कुठ्ठाळी सत्रांत भागात अवजड पेन महामार्गावरच कोसळल्याने मडगाव ते पणजी मार्गावरील वाहतुकीत तब्बल साडे तीन तास व्यत्यय आला. या अपघातामुळे दुरच्या रस्त्याने वाहतुक वळवणे भाग पडले. रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.

   वेर्णा केसरव्हाळ येथील महामार्गावरून खाली उतरल्यावर लागणाऱया संत्रात कुठ्ठाळी भागात तेथील नाक्याजवळच नवीन होऊ घातलेल्या झुआरी पुलाच्या उड्डाण पुलाच्या कामासाठी एक अवजड क्रेन पुलाच्या खांबासाठी घातलेल्या लोखंडी प्लेट उचलण्याचे काम करीत होती. यावेळी ही क्रेन एका बाजुला कलली आणि क्षणातच महामार्गावर कोसळली. त्यामुळे पूर्ण रस्ता बंद झाला. काही मिनिटांतच या रस्त्यावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या. पणजी मडगाव मार्गावरील वाहतुक अडकूनच पडली. त्यामुळे कुठ्ठाळी आगशी पणजीच्या दिशेने जाणारी वाहने वेर्णा नाक्यावरून उपासनगर, झुआरीनगर, सांकवाळ भागाच्या दिशेने वळवण्यात आली. तर वेर्णा, मडगावच्या दिशेने जाणारी वाहने कुठ्ठाळीच्या नाक्यावर तसेच ठाणा व पाजांतार या नाक्यावरून इतर मार्गावर वळवण्यात आली. याचा परीणाम म्हणून सांकवाळ गावांतील अंर्तगत रस्त्यावरही वाहतुक वाढून कोंडी झाली. मोठमोठी वाहनेही गावांतील छोटय़ा रस्त्यावरून धावू लागली. त्यामुळे पणजी मडगाव रस्त्यावर तसेच सांकवाळच्या छोटय़ा रस्त्यांवरही गदारोळ माजला. तब्बल साडे तीन तास हा गदारोळ चालू होता. दोनच्या  सुमारास ती कोसळलेली क्रेन उचलून मडगाव पणजी महामार्ग मोकळा करण्यात आल्यानंतर ही समस्या दूर झाली.

Related posts: