|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महापौर-उपमहापौरांना डावलून स्मार्टसिटी कामाचा शुभारंभ

महापौर-उपमहापौरांना डावलून स्मार्टसिटी कामाचा शुभारंभ 

प्रतिनिधी/ बेळगाव

स्मार्टसिटी योजनेचा शुभारंभ दीड वर्षापूर्वी करण्यात आला होता. पण विकासकामे राबविण्याचा मुहूर्त लाभला नव्हता. मात्र रविवारी विकासकामांचा शुभारंभ महापौर-उपमहापौर आणि नगरसेवकांना डावलून काही मोजक्मयाच व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. यामुळे यामागचे राजकारण काय? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

स्मार्ट योजनेतील कामांचा शुभारंभ जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी, आमदार फिरोज सेठ आणि जिल्हाधिकारी झियाऊला यांच्या उपस्थितीत उरकण्यात आला. या कार्यक्रमाचे निमंत्रण काही मोजक्मयाच व्यक्तीना देण्यात आले होते. शहराचा विकास करण्यासह नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. मात्र महापौर-उपमहापौर आणि नगरसेवकांना डावलून स्मार्टसिटी योजनेतील कामे राबविण्याचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे नगरसेवकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. श्रेय लाटण्यासाठी काही मोजक्मयाच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला असल्याची चर्चा आहे.

 काही वेळातच कार्यक्रम उरकला

स्मार्टसिटीचा प्रस्ताव महापालिका, विविध सामाजिक संघटना, सल्लागार आणि नगरसेवक तसेच शहरवासियाना घेऊन तयार करण्यात आला होता. मात्र कामाचा शुभारंभ करताना कुणालाच निमंत्रण देण्यात आले नाही. घिसाडघाईने कामाचा शुभारंभ अवघ्या अर्धा तासात उरकण्यात आला. स्मार्टसिटी योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने एक हजार कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात येणार आहेत.

 याअंतर्गत मंडोळी रोड आणि केपीटीसीएल कार्यालयाशेजारील रस्त्याचा विकास करण्यात येणार  आहे. हा रस्ता 80 फुटाचा करण्यात येणार असून  याकरिता 22 कोटी 39 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत फुटपाथ, सायकल ट्रक, भूमिगत केबल आदीसह विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. शिवबसवनगर केपीटीसीएल कार्यालयाशेजारील 750 मीटरचा रस्ता आणि मंडोळी रोडचा (950 मीटर) विकास करण्याचा प्रस्ताव आहे. या कामाचा शुभारंभ करण्यात आला.  जिल्हापालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याहस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांचे स्वागत स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त शशीधर कुरेर यांनी केले. याप्रसंगी उपायुक्त मन्मतया स्वामी, शहर अभियंते आर.एस.नायक,साहाय्यक कार्यकारी अभियंते रमेश न्यामगौडर, व्ही.एस.हिरेमठ, स्मार्टसिटी योजनेचे अभियंते शिवापुरे, किरण सुब्बाराव, महापालिकेचे अधिकारी व स्मार्टसिटी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

 यापूर्वी देखील शंभर कोटी निधीअंतर्गत विकासकामे राबविण्यात आली. पण त्या कामाचा शुभारंभ करताना महापौर-उपमहापौर आणि नगरसेवकांना निमत्रंण देण्यात आले नाही. आता स्मार्टसिटी योजनेच्या कामाच्या शुभारंभावेळीदेखील महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी महापौर-उपमहापौर आणि नगरसेवकांना निमंत्रण न देताच स्मार्टसिटी कामाचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला. काही मोजक्मयाच नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घिसाडघाईने उरकण्यात आला. याठिकाणी परिसराचे नगरसेवक कागतीकर वगळता एकही नगरसेवक उपस्थित नक्हते. 

कामाच्या शुभारंभाकरिता सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू सिद्दकी उपस्थित होते. पण याठिकाणी नगरसेवकांना निमत्रंण देण्यात आले नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनीदेखील कार्यक्रमच्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. यामुळे महापालिकेतील नगरसेवकांना काहीच किंमत नाही का? असा मद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

महम्मद मुल्ला असे जागीच ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. हसन हारुगेरी (वय 58), रबिया हारुगेरी (वय 40), फारुक हारुगेरी (वय 25), हुसेबा हारुगेरी (वय 22), आस्मा मुल्ला (वय 27) अशी गंभीर जखमीची नावे आहेत.

 घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, अब्दुललाट येथून अप्पे रिक्षा क्रमांक एमएच 09 एबी 9587 मधून चालक हसन हे सदलगा येथील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. त्यावेळी बोरगावहून लाटवाटीच्या दिशेने ज्योती स्टोन क्रशरचा डंपर (क्र. एमएच 09 बीसी 4363) जात होता. दरम्यान भोसले कॉर्नरनजीक येताच दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची धडक झाली.

 त्यात रिक्षातील महम्मद याच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो जागीच ठार झाला. तर हसन, रबिया, फारुक, हुसेबा व आस्मा हे गंभीर जखमी झाले. जखमीतील आस्मा यांचे सासर कोल्हापूर असून त्या माहेरी आपला मुलगा महम्मदला घेऊन आल्या होत्या. त्या दरम्यान त्यांच्या मुलावर काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. सदर अपघातात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने रिक्षाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजताच शिरोळचे आमदार उल्हास पाटील, जि. पं. सदस्य विजय भोजे, अब्दुललाट उपसरपंच वृषभ कोळी, सदस्य स्वप्नील सांगावे, शरद साखरचे एस. के. पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनेची माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळताच उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.