|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जिल्हय़ात काँग्रेसच्या दहा जागा न आल्यास राजकीय संन्यास

जिल्हय़ात काँग्रेसच्या दहा जागा न आल्यास राजकीय संन्यास 

जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची घोषणा

प्रतिनिधी/ बेळगाव

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. आगामी निवडणुकीत बेळगाव जिल्हय़ातील 18 पैकी दहा जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. दहापेक्षा कमी उमेदवार निवडून आल्यास राजकीय संन्यास घेणार असल्याचे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले. तसेच येडीयुराप्पांवर टीका करीत त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना मानसोपचाराची गरज असल्याचे सागितले.

रविवारी शिवबसवनगर येथे स्मार्टसिटी योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्हय़ात आगामी निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळतील, असा प्रश्न पत्रकारांनी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना विचारला. तसेच बेळगाव जिल्हय़ात 18 जागा भाजपच्या येणार असे वक्तव्य येडीयुराप्पा यांनी केले असल्याचे सांगितले. यावर बोलताना रमेश जारकीहोळी यांनी 18 पैकी दहाहून अधिक जागा काँग्रेसला मिळतील, असे सांगितले. जर दहा पेक्षा कमी जागा आल्यास आपण राजकीय संन्यास घेवू, असे ठामपणे सांगितले. तसेच जिल्हय़ातील सर्व जागा भाजपला मिळणे अशक्मय आहे. कारण हिंदूत्वाचा मुद्दा घेवून अशांतता निर्माण करणाऱया पक्षाला जनता जवळ करणार नाही, असे सांगितले.

अलिकडे येडीयुराप्पा यांचे मानसिक संतुलन बिघडले असून काहीही बोलत सुटले आहेत. तसेच वयाच्या मानाने काहीही बोलत आहे. त्यांना मानसोपचाराची आवश्यकता असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांना सागितले.

Related posts: