|Thursday, December 13, 2018
You are here: Home » Top News » हादीयाचा पती आयसीसीच्या संपर्कात होता : एनआयए

हादीयाचा पती आयसीसीच्या संपर्कात होता : एनआयए 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणातील हादिया या तरूणीचा पती लग्नापूर्वी आयसिस या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांच्या संपर्कात होता,अशी माहिती राष्ट्रय तपास यंत्रणेच्या (एनआयए)तपासातून समोर आली आहे.

हादियाचा पती शफीन जहान लग्नाच्या एक महिना आधी एका फेसबुक ग्रुप आणि प्रसिद्ध मेसेजिंग ऍपच्या माध्यमातून दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता असा दावा एनआयएने केला आहे. या फेसबुक ग्रुपमध्ये पॉप्यूलर प्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष एसडीपीआयचे काही सदस्यही होते.यासोबत , उमर अल-हिंदी प्रकरणात अटक करण्यात आलेले इसिसचे दहशतवादी मनसीद आणि साफवानदेखील या गुपमध्ये होते अशी माहिती एनआयएने दिली आहे.

मनसीद आणि साफवान यांना गतवर्षी ऑक्टोबर महिन्या उमर अल-हिंदी प्रकरणी एनआयएने अटक केली होती.त्यांच्यावर आरोप आहे की, इसिसपासून प्रभावित होऊन न्यायाधीश,पोलीस अधिकारी आणि राजकीर नेत्यांवर हल्ल करण्याचा कट आखला होता. एनआयएचा दावा आहे.

 

Related posts: