|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का : आवेसींचा सवाल

मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का : आवेसींचा सवाल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राम जन्मभूमीवरच राम मंदिर उभारण्यात येईल या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दाव्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप नोंदवला आहे.कोणत्या अधिकाराने मोहन भागवत अयोध्येत मंदिर उभारणार आहेत,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे.मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का? ते कोण आहेत,अशा शब्दांता त्यांनी भागवतांवर शाब्दिक प्रहार केला.

कर्नाटकच्या उडपी येथे आयोजित करण्यात आलेल्या अर्मसंसदेत भागवत यांनी राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारणार असल्याचे म्हटले होते. राम मंदिरावर वर एक भगवा झेंडा फडकेल. राम जन्मभूमीवर दुसऱया कशाचेही बांधकाम उभारले जाऊ शकत नाही,असे ते म्हणाले.

 

Related posts: