|Thursday, December 13, 2018
You are here: Home » उद्योग » ‘मनीटॅप’कडून व्याजदरात कपात

‘मनीटॅप’कडून व्याजदरात कपात 

प्रतिनिधी/ मुंबई

‘मनीटॅप’ या भारताच्या पहिल्या ऍप्लिकेशन आधारित पतकर्ज सुविधेने (ऍप बेस्ड क्रेडिट लाईन) आता दहा लाख वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला. अल्प, मध्यम उत्पन्न गटांना सेवा देण्यासाठी ‘मनीटॅप’ने वार्षिक व्याजदर 15 टक्क्यांवरून 13 टक्क्यांपर्यंत कमी केला. गेल्या तीन महिन्यांत सणासुदीच्या काळामुळे कंपनीने तिप्पट अधिक प्रगती करून दाखवली असून सध्याच्या लग्नसराईच्या हंगामातही असाच सातत्यपूर्ण वेग अनुभवाला येत आहे. ‘मनीटॅप’ ही भारताची पहिली क्रेडिट लाईन देशभरातील 20 शहरांत उपलब्ध आहे. आपल्या नियमित गरजांसाठी पैशाची तंगी जाणवणाऱया लाखो भारतीयांना मनीटॅप कशी मदत करू शकते, याच्या शक्यता पाहूनच आम्ही आनंदित झालो आहोत,’ असे ‘मनीटॅप’चे सहसंस्थापक अनुज कक्कर म्हणाले.

‘मनीटॅप’ हे सध्या बाजारातील एकमेव उत्पादन आहे, जे आपल्या ग्राहकांना घ्पच्या माध्यमातून कार्ड आणि रोख रक्कम दोन्हीही वापरण्याची सुविधा देते. मनीटॅपवरील 60 टक्के व्यवहार हे रोख रकमेचे असतात, तर 40 टक्के कार्ड पेमेंट्समधून होतात.

आपल्या जलद विस्तार योजनांशी सुसंगती राखत ‘मनीटॅप’ आपल्या कर्मचाऱयांची संख्या वाढवत आहे आणि पुढील 6 महिन्यांत तंत्रज्ञान, माहितीसाठी, योजना, विपणन आदी विभागांत 50 नवे सहकारी समाविष्ट करण्याची योजना आहे. ‘मनीटॅप’ने मार्च 2018 पर्यंत 6 अन्य बँका व बँकेतर वित्तीय संस्थांशी सहयोग, तसेच देशातील 50 शहरांत विस्ताराची योजना आखली आहे.  ’मनीटॅप‘ या बंगळुरुल्लस्थित नवउद्योगाने अलिकडेच सिक्वोया इंडिया, एनईए अँड प्राईम व्हेंच्युअर पार्टनर्स यांच्याकडून 12.3 मिलियन डॉलरचे वित्तसाह्य मिळवले आहे.  

Related posts: