|Friday, October 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोहम्मद ताहीरच्या फाशीला स्थगिती

मोहम्मद ताहीरच्या फाशीला स्थगिती 

प्रतिनिधी/ मुंबई

1993च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद ताहीर मर्चंडच्या फाशीला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. 93 च्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरेपींना पाकिस्तानात जाऊन त्यांना शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचे प्रशिक्षण घेता यावे म्हणून मर्चंडने काही साथीदारांसोबत दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवले होते.

मर्चंड हा दाऊद इब्राहिम कासकर आणि त्याच्या भावंडांसोबतच लहानाचा मोठा झाला. दाऊदचा साथीदार म्हणूनच त्याची ओळख होती. त्यामुळे 1993च्या बॉम्बस्फोटात त्याचा सक्रिय सहभाग होता. पाकिस्तानात तरुणांना पाठविणे, त्यासोबतच तरुणांना अशा घातकी कामांसाठी तयार करणे अशा कामांची जबाबदारी मर्चंडवर सोपवली होती.

Related posts: