|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘केंद्रशाळा बानगे’स सर्वसाधारण विजेतेपद

‘केंद्रशाळा बानगे’स सर्वसाधारण विजेतेपद 

वार्ताहर / सावर्डे बुद्रुक

पं. स. कागल अंतर्गत घेण्यात आलेल्या हिवाळी क्रीडास्पर्धा केंद्रशाळा बानगेच्या मैदानावर उत्साहात संपन्न झाल्या. सदर स्पर्धेचे उद्घाटन बानगेच्या सरपंच सौ. वंदना रमेश सावंत व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत झाले. दोन दिवसांमध्ये स्पर्धा अत्यंत उत्साहात व खिलाडूवृत्तीचे निखळ दर्शन घडवत पूर्णत्वास गेल्या.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- कबड्डी (मोठा गट) अनुक्रमे- म्हाकवे, भडगाव (मुले), म्हाकवे, बानगे (मुली). लहान गट- म्हाकवे, आनूर (मुले), म्हाकवे, आनूर (मुली). खो-खो (मोठा गट), पिंपळगाव बुद्रुक, भडगाव (मुले), पिंपळगाव बुद्रूक, बानगे (मुली). लहान गट- पिंपळगाव, भडगाव (मुले), पिंपळगाव, भडगाव (मुली). रिले- म्हाकवे, आनूर (मुले), आनूर, बानगे (मुली).

100 मी. धावणे- गुरुप्रसाद खतकर (भडगाव), अजय पाटील (म्हाकवे), अंकीता तोडकर (आनूर), ऋतूजा देवडकर (म्हाकवे). 50 मी. धावणे – प्रथमेश बोंगार्डे (बानगे), धीरज डाफळे (पिंपळगाव), समीक्षा खतकर (भडगाव), संस्कृती पाटील (म्हाकवे). 200 मी. धावणे- गुरुप्रसाद खतकर (भडगांव), तेजस माने (कौलगे), ऋतूजा शिवेकर (आनूर), सनिका पोवार (म्हाकवे). 100 मी. धावणे- शुभम पाटील (म्हाकवे), आरमान मुजावर (बानगे), अमृता पाटील (म्हाकवे), आदिती यादव (बानगे). 400 मी. धावणे- प्रतिक चौगले (म्हाकवे), हर्षद देवडकर (आनूर), गायत्री चौगुले (भडगाव), श्रृतिका हिरुगडे (बानगे).

गोळाफेक (मुले)- आदिनाथ कुंभार (आनूर), श्रेयस पाटील (म्हाकवे), सत्यजीत चोपडे (बानगे). मुली- किरण सावडकर (आनूर), छायाताई जिरगे (बानगे), सानिका पवार (म्हाकवे). थाळीफेक (मुले)- आदिनाथ कुंभार (आनूर), सुशांत पाटील (बानगे), प्रथमेश पाटील (पिंपळगाव ), मुली- माधुरी चव्हाण(बानगे), श्रध्दा खोत (आनूर), श्रावणी देसाई (कौलगे). लांबउडी (मले)- गुरुप्रसाद खतकर (भडगाव), अजय पाटील (म्हाकवे), मुली- सानिका पोवार (म्हाकवे), ऋतूजा शिवेकर (आनूर). उंची उडी (मुले)- योगेश पाटील (म्हाकवे), आदिनाथ कुंभार (आनूर), ऋतूज शिवेकर (आनूर), सानिका माने (पिंपळगाव). कुस्ती (मुले, 25 किलो)- सोहम कुंभार (म्हाकवे), प्रथमेश पाटील (बानगे). मुली- प्रतिक्षा सावंत (बानगे). 30 किलो- रोहीत एरुडकर (पिंपळगाव), धनराज जमनिक (बानगे), मुली- तृप्ती गुरव ( आनूर), आर्पिता जमनिक (बानगे). 35 किलो (मुले)- अभिजीत बोंगार्डे (बानगे), हर्षवर्धन एरुडकर (पिंपळगाव), मुली- रिया ढेंगे (बानगे), संजीवनी माने (आनूर). 40 किलो- सुशांत पाटील (बानगे), संकेत गोते (आनूर), मुली- समृध्दी पाटील (आनूर), श्रृतिका हिरुगडे (बानगे), 45 किलो (मुले)- सुशांत किल्लेदार (बानगे), नंदन जाधव ( कौलगे), मुली- माधुरी चव्हाण (बानगे), वैष्णवी कांबळे (आनूर). 

यावर्षी प्रथमच मुलींच्या कुस्ती स्पर्धा प्रेरणादायी ठरल्या. जनरल चॅम्पियनशीप शिवाजी पाटील यांचेकडून तर इतर बक्षीसे विजय पाटील, उत्तम पाटील, सुनिल कदम, बी. जी. पटेल तसेच सुजीतकुमार इंगवले यांचे सौजन्याने देण्यात आली. पंच म्हणून के. बी. चौगले व हवलदार सर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांचे क्रीडाशिक्षक, अध्यापक व मुख्याध्यापक यांनी प्रयत्न केले.

Related posts: