|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » उर्मी, मधुराची राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत निवड

उर्मी, मधुराची राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत निवड 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

स्पोर्टस् डान्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने संगमनेर (अमहदनगर) येथे चौथ्या राज्यस्तरीय स्पोर्टस् डान्स स्पर्धा पार पडल्या. यामध्ये शास्त्राrय नृत्य प्रकारात उर्मी पाटील हिने रौप्य आणि मधुरा बाटे हिने कास्य पदक पटकावले.

उर्मी पाटील हिने 16 वर्षाखालील वयोगटात तर मधुरा बाटे हिने 12 वर्षाखालील वयोगटात यश संपादन केले. या दोघीही सुर्वेनगर येथील महावीर इंग्लीस स्कूलच्या विद्यार्थीनी आहेत. त्यांना नृत्य चंद्रिका संयोगीता पाटील यांचे मार्गदर्शन तर महावीर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष ललीत गांधी, सचिव महेश सामंत, मुख्याध्यापिका धनश्री व्हनागडे, निलम जाधव आणि कोल्हापूर डान्स असोसिएशनचे सचिव मनोज सातपुते यांचे प्रोत्साहन लाभले.

Related posts: