|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नूतन सरपंचांनी गावात सी.सी.टिव्ही. बसवून घ्यावेत

नूतन सरपंचांनी गावात सी.सी.टिव्ही. बसवून घ्यावेत 

वार्ताहर/ गोकुळ शिरगाव

  नूतन सरपंच आपल्या गावातील प्रत्येक चौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे ताबडतोब बसवून घ्यावेत त्यासाठी लागणारा निधी ग्रामपंचायत खर्चातून करुन हे काम पुर्ण करावे. असे अवाहन गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक युवराज खाडे यांनी केले.

जनसुराज्य परिवर्तन संघर्ष क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित नुतन सरपंच सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनसुराज्य परिवर्तन क्रांतीचे प्रविण शिंदे होते. गोकुळ शिरगाव, नेर्ली, कणेरी, कणेरीवाडी, उजळाईवाडी या गावातील नुतन सरपंचाचा भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.

ते म्हणाले गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील गावे ही संवेदनशिल असून पोलिसांना नेहमी सहकार्य करत असतात. या गावांना औद्योगिक वसाहतींचा मोठय़ा प्रमाणात विळखा असल्याने अनोळखी लोक गावातुन फिरत असतात. त्यामुळे या गावामध्ये प्रत्येक चौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असणे अत्यंत आवश्यक आहे.

यावेळी प्रविण शिंदे बहुजन परिवर्तन पार्टीचे अध्यक्ष बाजीराव नाईक, भारीप बहुजन महासंघाच्या सचिव प्रियाताई कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी कणेरीचे सरपंच उज्ज्वला शिंदे, उजळाईवाडी सरपंच सुवर्णा माने, नेर्ली सरपंच प्रकाश पाटील, कणेरीवाडी सरपंच सुरेखा खोत, गोकुळ शिरगावचे सरपंच महादेव पाटील, चंद्रकांत शिंदे, महेश शिंदे, सुजाता गुरव, वर्षा कदम, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरिक्षक ए. एस. नागरगोजे, आदी सह भागातील माजी सरपंच उपसरपंच उपस्थित होते.

Related posts: