|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वृत्तपत्र विक्रेत्यांचे आज आंदोलन

वृत्तपत्र विक्रेत्यांचे आज आंदोलन 

जिल्हाधिकारी कार्यालयसमोर करणार निदर्शने :

प्रतिनिधी/ सांगली

राज्याचे कामगार मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी 15 ऑगष्ट पर्यंत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन दिले होते.  मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेने निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.

राज्य संघटनेचे उपाध्यक्ष विकास सुर्यवंशी यांनी या आंदोलनात जिह्यातील  सर्व वृत्तपत्र विक्रेते व एजंटांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. सांगली जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, मारुती नवलाई, संघटन सचिव संजय पावसे, विनोद पन्नासे, अंबादास वाकोडे, रघुनाथ कांबळे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Related posts: