|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जुने गोवेत सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उत्साहात

जुने गोवेत सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उत्साहात 

प्रतिनिधी/ तिसवाडी

जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियरचे फेस्त सोमवार दि. 4 रोजी दिवसभर जुने गोवे येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत सेंट फ्रान्सिस झेवियरचे उत्साहात साजरे करण्यात आले.  प्रमुख प्रार्थनासभेला उडपीचे आर्चबिशप जेराल्ड लोबो, गोव्याचे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव, सिंधुदुर्गचे आर्चबिशप ऑल्वीन बार्रेटो, आर्चबिशप आलेक्स डायस, पॅट्रोसियो फर्नांडिस व अन्य ज्ये÷ धर्मगुरूंच्या उपस्थितीत  झाली.

या प्रार्थनासभेचा मोठय़ा संस्थेतील भाविकांनी लाभ घेतला. फेस्ताच्या पुर्वसंध्येला व दिवसभर देश विदेशातील पर्यटक व मोठय़ा संस्थेतील गोवेकर यांनी जुने गोवे येथे फेस्ताला उपस्थिती लावली. दिवसभरात फेस्ताला उपस्थित राहिलेल्या भाविकांची संस्था दीड दोन लाखांच्या घरात होती.

बेसिलिका बॉ जीझसच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य मंडपातील आकर्षक वेधीवर  पहिली प्रार्थना सभा पहाटे 4 वाजता संपन्न झाली. मध्यरात्री व पहाटेपासूनच भाविकांनी सेंट झेव्हियरच्या दर्शनासाठी व प्रार्थनासभासाठी उपस्थित राहण्यासाठी चर्च परिसरात रांगा लावल्या होत्या. दूसरी पहाटेची प्रार्थनासभा 5 वाजता संपन्न झाली. यानंतर सकाळच्या सत्रातील 6, 7, 8 व 9 वाजता आयोजित केलेल्या उर्वरित सभाही संपन्न झाल्या. फेस्ताची मुख्य प्रार्थनासभा सकाळी 10.30 वा. याच वेधीवर संपन्न झाली.

 प्रमुख यजमान यांच्या मुखातील आशिर्वचनाचा लाभ मोठया संस्थेने उपस्थित राहिलेल्या भाविकांनी घेतला. या प्रार्थना सभेला गोव्यातील कानाकोपऱयातील भाविक तसेच शेजारील राज्यातील भाविक उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रमुख यजमानाच्या उपदेशपर संदेशाचा येथे लाभ घेतला. दुपारच्या सत्रातील प्रार्थना सभा दुपारी 12.30 वाजता सुरू झाली. यानंतर संध्याकाळी 3 वा. स्पॅनीश व 4 वा. शेवटी 6 वा. इंग्रजी प्रार्थनासभा संपन्न झाली. प्रमुख प्रार्थनेबरोबर दिवसभरातील अन्य प्रार्थना सभांनाही प्रचंड गर्दी होती. चर्चला जोडणाऱया रस्त्यावर वाहने अडवून पडू नयेत यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला होता. त्याचा अमल मात्र झाला नाही. यामुळे राष्ट्रीय महामार्ग तसेच अन्य अंतर्गत मार्गावर ताण पडला. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ठिक ठिकाणी गोवा पोलिस तैनात करण्यात आले होते.

 बॉ जीझस बेसलीकामध्ये बंद पेटीत असलेले सेंट फ्रान्सिस झेव्हियरचे शवाचे दर्शन दुरून घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली. गर्दी अपेक्षित असल्याने भाविकांना चर्चमध्ये रांगेत प्रवेश दिला गेला. यामुळे भाविकाना सुरळीतपणे चर्चमध्ये प्रवेश घेता आला.

यावेळी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर,  कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, नगरविकासमंत्री विजय सरदेसाई, सौ. गावडे,  आमदार चर्चिल आलेमांव, आमदार रेजिनार्ड लॉरेन्स, आमदार ग्रेन टिकलो, माजी खासदार एदुआर्द फालेरो, तसेच आजी-माजी राजकीय पुढारी, जुने गोवेचे सरपंच जनिता मडकईकर,धर्मगुरु, सिस्टर्स, ब्रदर्स, राज्यभरातील चर्च प्रतिनिधीही आज या वार्षिक फेस्ताला उपस्थित राहिले. जुने गोवे येथील या फेस्तानिमित्त ख्रिश्चन, हिंदू व अन्य धर्माचे भाविक आदिंनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून सेंट झेव्हियरचे दर्शन घेतले. दिवसभरात प्रार्थनासभा चालू असल्याने पुरा प्रार्थना मंडप व चर्च परिसर गजबजून राहिला. से कॅथेड्रल परिसरातहीमोठी गर्दी होती.

रस्त्यांच्या दुतर्फा दुकाने थाटली

फेस्तानिमित्त गांधी सर्कल जवळील तिन्ही बाजूंच्या रस्त्यांच्या दुतर्फा थाटलेल्या दुकानात ग्राहकांनी लाखेंची खरेदी केली. त्यांनी आपल्या आवडीच्या वस्तूंची खरेदी केली. वस्तूंचे भाव गगनाला भिडले असले तरी त्यांनी खरेदीत कोणतीच कसर सोडली नाही. यात मेणाच्या वाती, आंगवणीसाठीचे मेणाचे अवयव, फुले, फुलांचे हार आदिंची प्रचंड खरेदी सोय, पोलिस बंदोबस्त चोख होता तरीही किरकोळ गोष्टी वगळता भाविकांना जबर त्रास झाला नसल्याने काही भाविकांनी आपल्या माहितीत सांगितले.

भाविक प्रामुख्याने जुने गोवे येथे फेस्ताला उपस्थित राहण्यासाठी राज्यातील प्रमुख महामार्गाचा वापर केला. येथील बॉम जीझस आणि से कॅथेड्रल चर्च परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजलेला होता. येथील हिरवळीवर अनेकांनी आज विश्रांतीही घेतली. फेस्ताच्या काळात येथे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती स्थानिक पोलिस सुत्रांनी दिली.

ताज खाजे, भाजलेले चणे, खाद्य पदार्थ, थंड पेय, पावभाजी, रेवडया, खेळणी , रेडिमेड कपडे, भांडी, आवश्यक वस्तु इत्यादी खरेदीही प्रचंड प्रमाणात झाली. ही कोटय़वधीच्या घरात होती. रात्री उशिरापर्यत लोक खरेदीत गुतंले होते. गोवा, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, कोलकता आदि राज्यातून आलेल्या पर्यटकांनी व भाविकांनी आज जुने गोवे येथील फेस्ताचा पुरेपूर आनंद लुटला.

Related posts: