|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » लाटांच्या तडाख्यांमुळे खोलांत किनाऱयावरील संरक्षक भिंत कोसळली

लाटांच्या तडाख्यांमुळे खोलांत किनाऱयावरील संरक्षक भिंत कोसळली 

प्रतिनिधी/ वास्को

वादळी हवामानामुळे खवळलेल्या समुद्राच्या लाटांनी खोलांत किनाऱयावरील संरक्षक भिंतीला तडाखे दिल्याने ही भिंत कोसळण्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. लाटांमुळे एकूण चार ठिकाणी ही भिंत कोसळली.

वास्कोतील बायणा किनारा मोकळा असल्याने या ठिकाणी कोणतीही नुकसानीची घटना घडली नाही. मात्र, खवळलेल्या समुद्रामुळे दृष्टी मरीन कंपनीला आपल्या जेटीचे काम गुंडाळावे लागले. बोगमाळो किनाऱयालाही खवळलेल्या समुद्राचा आतापर्यंत कोणताही फटका बसलेला नाही. मात्र, बोगमाळोला जवळ असलेल्या खोलांत समुद्र किनाऱयावरील संरक्षक भिंतीला जोरदार लाटांच्या तडाख्यांनी धक्का दिला. किनाऱयाच्या डाव्या बाजुला असलेल्या डोंगराच्या संरक्षक भिंतीला लाटांचे तडाखे बसून सुमारे चार मिटर उंच मजबूत भिंत एकूण चार ठिकाणी कोसळली. मध्यरात्रीच्या वेळी ही घटना घडली.

परराज्यातील ट्रॉलर वास्कोतील समुद्रात आश्रयाला

समुद्रात घोंगावणाऱया चक्री वादळामुळे गोव्याच्या शेजारील राज्यातील मच्छीमारी ट्रॉलर वास्कोतील समुद्रात आश्रयाला आलेले आहेत. मोठय़ा संख्येने हे ट्रॉलर खारवीवाडा किनाऱयापासून दूर अंतरावर मुरगाव ब्          ांदरानजीक नांगरण्यात आलेले आहेत. हे ट्रॉलर मच्छीमारीसाठी खोल समुद्रात पोहोचले होते. मात्र, वादळाच्या घेऱयात सापडण्याच्या भितीने त्यांना आपल्या राज्यांतील धक्क्यांकडे न फिरता वास्कोतील किनाऱयाकडे वळण्यास भाग पडले. वास्कोतील समुद्रात हे ट्रॉलर सुरक्षीत आहेत.

Related posts: