|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जाणता राजा तिकीट विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद

जाणता राजा तिकीट विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

बेळगाव / प्रतिनिधी

तरुण भारत ट्रस्ट आयोजित जाणता राजा या महानाटय़ाच्या तिकीट विक्रीला सोमवारी सकाळपासून सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी शिवप्रेमींनी तुफान गर्दी करत तिकिटे खरेदी केली. काही जणांनी पुढील दिवसांचे आगाऊ तिकीट बुकिंग केले. सर्वच तिकीट केंद्रांवर नागरिकांनी अफाट गर्दी करून जाणता राजा पाहण्याची इच्छा दाखवून दिली आहे.

येत्या दि. 9 डिसेंबरपासून सीपीएड् मैदानावर हे भव्यदिव्य महानाटय़ बेळगावकर रसिकांना पाहता येणार आहे. नाटय़ाची तिकिटे केव्हा उपलब्ध होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. अखेरीस रविवारी तिकीट विक्रीचा शुभारंभ करून सोमवारपासून प्रत्यक्ष तिकीट विक्रीला सुरुवात झाली. हर व खानापूर तालुक्मयात एकूण 24 ठिकाणी तिकीट विक्री सुरू करण्यात आली आहे.

निवडक लोकमान्य सोसायटी तसेच तरुण भारत कार्यालय व इतर दुकानांमध्येही तिकीट विक्री सुरू झाली आहे. तिकिटांचे दर 1000, 700, 500, 300, 150 व गॅलरी 200 रुपये असे ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी सोमवारी सकाळी तिकीट विक्री केंद्रांवर रांगा लावून तिकीट खरेदी केली.

तब्बल 12 वर्षांनी पुन्हा एकदा जाणता राजा बेळगावमध्ये येत असल्याने बेळगावकर शिवप्रेमींना पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे तिकीट विक्रीच्या पहिल्या दिवसापासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. मिळालेल्या या उत्स्फूर्त उत्साहामुळे आयोजकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगावकरांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल तरुण भारत ट्रस्टतर्फे आभार मानण्यात येत आहे.

Related posts: