|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दंगलखोरांवर 307 कलमाचा वापर

दंगलखोरांवर 307 कलमाचा वापर 

17 जणांना अटक, बळ्ळारी कारागृहात रवानगी

प्रतिनिधी / बेळगाव

रविवारी रात्री क्षुल्लक कारणावरुन दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. कसई खड्डा, कामत गल्ली परिसरात झालेल्या दगडफेक प्रकरणी 17 जणांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी बळ्ळारी कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान दंगलखोरांवर भा.दं.वि. 307 कलमान्वये खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्केटचे पोलीस निरीक्षक प्रशांत एस. यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. कसई खड्डा व कामत गल्ली परिसरातील घटना क्षुल्लक कारणावरुन घडली आहे. दंगलखोरांवर भा.दं.वि. 143, 147, 148, 307, 427, 279 सहकलम 149 अन्वये रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी धरपकड केली आहे. कसई गल्ली, कसई खड्डा व कामत गल्ली येथील 17 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व 17 जणांची सोमवारी सकाळी सिव्हील हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्दितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांची रवानगी बळ्ळारी कारागृहात करण्यात आली आहे.

बदरुद्दीन गौसलाल बेपारी (वय 28), वाहीद बाशा बेपारी (वय 24), तौसीफ सिकंदर बेपारी (वय 26), सलीम गफुर बेपारी (वय 24), आसीफ गौसलाल बेपारी (वय 27), तोहीद बाशा बेपारी (वय 26), महम्मदगौस फकरुसाब बेपारी (वय 42), आश्रफखान फिरोजखान पठाण (वय 19), नासीर उर्फ हुसेनखान फौरोजखान पठाण (वय 22), अब्दुल इमामसाब गणिवाले-पारिश्वाड (वय 25, सर्व रा. कसई गल्ली व कसई खड्डा) अशी एका गटातील 10 जणांची नावे आहेत.

तर या प्रकरणी कामत गल्ली येथील शिवाजी सिद्धाप्पा कुट्रे (वय 30), अशितोष जोतिबा भातकांडे (वय 23), अभिजित अमृत भातकांडे (वय 24), संजय धर्माजी जाधव (वय 45), उज्ज्वल अमृत भातकांडे (वय 18), राजू पांडुरंग सदावर (वय 21), सौरभ विजय किल्लेकर (वय 20) या सात जणांना अटक करण्यात आली आहे. मार्केटचे एसीपी शंकर मारिहाळ, पोलीस निरीक्षक प्रशांत एस. व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.

समज दिल्याने धुडगूस

बदरुद्दीन बेपारी (वय 28) हा तरुण केए 22 ईजी 3801 क्रमांकाच्या मोटारसायकलवरुन सुसाट वेगाने जात होता. याचवेळेला रस्त्यावर मुले खेळत होती. कसई खड्डा परिसरात काही तरुणांनी त्याला अडवून रस्त्याशेजारी मुले खेळत आहेत. जरा सावकाश मोटार सायकल चालव, अशी समज दिली होती. त्यामुळे बदरुद्दीनने आपल्या साथीदारांना बोलावून दगडफेक सुरु केली. दुसऱया बाजूनेही दगडफेक झाली. या दगडफेकीत तीन ऑटोरिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. क्षुल्लक कारणावरुन ही घटना घडली असून समाजकंटकांनी या घटनेनंतर कामत गल्ली, कसई गल्ली परिसराला वेठीस धरण्याचा प्रकार घडला.

Related posts: