|Thursday, December 14, 2017
You are here: Home » Top News » यशवंत सिन्हांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा

यशवंत सिन्हांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी यशवंत सिन्हा यांनी आकोल्यात केलेल्या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे.शेतकऱयांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करावे लागते ही लज्जास्पद बाब आहे,अशी टीका पवारांनी केली. दुसरीकडे शिवसेना आणि भारिपनेही या आंदोलनाला पाठिंबा देत रास्ता रोको केला.

आकोल्यातील शेतकरी जागर मंचद्वारा कापूस,सोयाबीन आणि धान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेत संबोधित करताना यशवंत सिन्हा यांनी शेतकरी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करतील असा इशारा देत आकोल्यापासून आंदोलनाला सुरूवात करू अशी घोषणा केली होती.यानुसार सोमवारी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.त्यानंतर पोलिसांनी यशवंत सिन्हा व नेत्यांना ताब्यात घेतले. रात्री त्यांची सुटका देखील झाली होती.

 

 

 

 

Related posts: