|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दोन बस अपघातात 21 जण जखमी

दोन बस अपघातात 21 जण जखमी 

पिकअप गाडी दरीत कोसळली

 

वार्ताहर /संगमेश्वर

संगमेश्वर-कोल्हापूर राज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसमध्ये झालेल्या अपघातात 21 जण जखमी झाले आहेत. तर दुसऱया अपघातात पिकअप गाडी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी दरीत कोसळून चारजण जखमी झाले आहेत. दोन्ही अपघातात एकुण 25 जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी 8 ते 12 वाजताच्या सुमारास घडला.

बस अपघातात चालक महेंद्र धोंडीराम मोहिते (51, रा देवधामापूर ता. संगमेश्वर) सुधाकर हरि नेवरेकर, द्रौपदी तुकाराम कांबळे (53, कुंडी), दक्षता दत्ताराम निंगावले (30, देवरुख), प्रसाद नरेंद्र कनावजे (25, चिपळुण), समिक्षा सावंत (25), रुपेश तुकाराम कांबळे (21, रा. कुंडी), अनुक्षा शैलेश गुरव (27, रा. बोंडय़े), शैलेश राजाराम गुरव (30, बोंडय़े), राजाराम भिकाजी गुरव (65) सविता अनंत पवार (60,रा. निवळी), जयवंती गंगाराम कोरेकर (60,रा. कुळेवाशी), गंगाराम धोंडीराम कोरेकर (68, कुळेवाशी), रसिका यशवंत भालेकर (20, सायले), राजाराम रामजी कदम (80, कोंडीवरे), अनंत दौलत पवार (50, निवळी), सरस्वती शिवराम जाधव (30, पाटगाव), आशिष गुरव (22), हिंदूराव गोविंद सुतार (32), नसीबा युसुफ शिरगावकर (34, आंबवली), मिलाप नारायण लाड (53), संजय गोविंद गेल्ये (35) हे अपघातात जखमी झाले.

महेंद्र धोंडीराम मोहिते हे आपल्या ताब्यातील एसटीबस घेवून देवरुखहून संगमेश्वर रेल्वे स्टेशनकडे निघाले होते. ही बस लोवले येथे आली असता याच दरम्यान संगमेश्वर-देवरुख ही बस चालक हिंदूराव गोविंद सुतार हे घेवून निघाले होते. सकाळी 11.55 वाजताच्या सुमारास दोन्ही बस लोवले येथे आल्या असता संगमेश्वरहून देवरुखला जाणाऱया बसने संगेमश्वर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱया बसला चालकाच्या बाजूला धडक दिली. यामध्ये बसमधील 21 प्रवासी जखमी झाले आहेत.

दुसऱया अपघातात गोव्याहून मुंबईकडे निघालेली पिकअप गाडी संगमेश्वर जवळच्या रामकुंड वळणावर आली असता चालक मोहम्मद अक्रम सावंत (40, रा. गोवंडी) यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दरीत जावून कोसळली. हा अपघात सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडला. अपघातात सुरेश वसंत गौतम (35), शबीर फकीर खान (35, रा. वडाळा-मुंबई) व मायाराम घसीटे (25, रा. मुंबई) हे जखमी झाले आहेत.

पिकअप गाडी दरीत कोसळली असताना तेथून जाणारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अंबरीश आगासे यांनी पाहिले व त्यांनी रुग्णवाहिका चालक प्रसाद सप्रे व 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधून अपघातातील जखमींना स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढले. जखमींना तात्काळ संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची खबर मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शेटय़े सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. या दोन्ही अपघातांची नोंद संगमेश्वर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

Related posts: