|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राहुल गांधीच होणार अध्यक्ष

राहुल गांधीच होणार अध्यक्ष 

11 रोजी औपचारिक घोषणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी राहुल गांधी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मंगळवारी त्यांची निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज छाननीनंतर अन्य कोणाही उमेदवाराचा अर्ज आला नसल्याचे काँग्रेसचे निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मुलापल्ली रामचंद्रन यांनी सांगितले. त्यांच्या अध्यक्षपदाची औपचारिक घोषणा 11 रोजी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

राहुल यांच्या नावाने एकूण 89 प्रस्ताव दाखल झाले आहेत. एका प्रस्तावामध्ये 10 प्रस्तावक असतात, असे एकूण 890 प्रस्तावकांनी त्यांचे निवेदन दिले आहे, असे रामचंद्रन यांनी सांगितले. पक्षांतर्गत असणारी अध्यक्षपदाची ही निवडणूक पूर्णपणे लोकशाही पद्धतीने राबवण्यात येत आहे. ही प्रक्रिया पारदर्शी असून कोणीही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. अध्यक्षपदासाठी काँग्रेस 10 प्रस्तावांची आवश्यकता असते. सध्या 11 प्रस्ताव दाखल झाले असून सर्व राहुल यांच्या नावाचे आहेत. त्यामुळे ते अध्यक्ष होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Related posts: